Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

‘हर हर महादेव’ चित्रपट दाखवणे बंद करावं अन्यथा चित्रपटगृह बंद पाडण्यात येतील -चंद्रशेखर घाडगे


पुणे:वेडात मराठे वीर दौडले सात…’ हा सुद्धा चित्रपट शेंबडी आणि बालिश पोरांना घेऊन तयार करण्यात आलेला आहे. अकराळ विक्राळा मावळे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. इतिहासातील हरामखोरी थांबवा. सुबोध भावे, अभिजीत देशपांडे, अक्षय कुमार किंवा महेश मांजरेकर… छत्रपती शिवाजी महाराजांचा कर्तुत्वान इतिहास बदनाम करू नका. चित्रपटगृहाचे पडदे फाडल्याशिवाय तुम्हाला अक्कल येणार नाही सरकारने या चित्रपटावर बंदी घालावी. नगर रोड परिसरातील फिनिक्स मार्केट मधील व त्याच्या पुढे एक किलोमीटर वर असणारे पी व्ही आर तसेच बॉलिवुड या चित्रपटगृहात छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवणे बंद करा.
अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने ते चित्रपटगृह बंद पाडण्यात येतील असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिला.
पुणे नगर रोड परिसरातील फिनिक्स मार्केट मधील व त्याच्या पुढे एक किलोमीटर वर असणारे पी व्ही आर तसेच बॉलिवुड या चित्रपटगृहात छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवणारा हर हर महादेव चित्रपट दाखवणे बंद करावं अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या स्टाईल ने तिन्ही चित्रपटगृह बंद पाडण्यात येतील. असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading