माहेश्वरी मित्र परिवार ,कोथरूड तर्फे अन्नकोट उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा
पुणे : माहेश्वरी मित्र परिवार कोथरूड, महेश प्रोफेशनल फोरम गोल्डन ऐरा तर्फे विविध प्रकारच्या 56 मिठाई, भगवंताचे कीर्तन आरती आदी कार्यक्रमांनी पौड रस्त्यावर एम आय टी कॉलेजच्या आवारातील श्री रामदेवजी बाबा मंदिरात अत्यंत उत्साहाच्या वातावरणात शनिवारी सायंकाळी अन्नकोट उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला
दिपावळीनिमित्त अन्नकोट उत्सव आयोजित करण्यात आला होता मंदिराच्या आवारात आकर्षक रांगोळी काढून परिसर सजविण्यात आला होता फुलांची मनमोहक व सुवासिक सजावटीच्या मंदिर सजविण्यात आले होते
श्री रामदेवबाबा आणि दुर्गामाता देवीपुढे केळी, सफरचंद, पासून चकली, शंकरपाळी,चिवडा, करंजी, बालूशाही,बर्फी लाडू आदी प्रकारच्या विविध 56 प्रकारचे मिठाई, रसमलाई, जिलेबी सुध्दा ठेवण्यात आली होती
श्रीकृष्ण व राधाची पूजा आकर्षक पद्धतीने करण्यात आली होती प्रसिद्ध भजन सम्राट कन्हैयाजी आगीवाल यांनी सादर केलेल्या भजन गायनाने भाविक भक्तिरसात न्हाऊन निघाले
श्री सुधाकर बेहेडे व रामचंद्र पखाल यांच्या हस्ते आरती करण्यात आली
याप्रसंगी अध्यक्ष अरुण भराडीया,सचिव आशिष बाहेती,कोषाध्यक्ष कृष्णकुमार काबरा, कार्याध्यक्ष गणेश मुंदडा भगीरथ राठी, उपाध्यक्ष अशोक मालू सहसचिव हरीश जाजू, आदी मान्यवर उपस्थित होते
