Thursday, May 28, 2026
Latest NewsSports

भारतीय वरिष्ठ गट टेनिक्वाईट संघ निवड समितीमध्ये पुण्याचे अनिल वरपे यांचा समावेश

पुणे : पश्चिम जर्मनी येथे जुलै २०२३ दरम्यान होणाऱ्या पाचव्या जागतिक टेनिक्वाईट अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ सहभागी होणार आहे.सदर संघ निवड येत्या १० नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२२ दरम्यान सोनिपत (हरियाणा) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमधून करण्यात येणार आहे.टेनिक्वाईट फेडरेशन ऑफ इंडिया यांनी गठीत केलेल्या निवड समितीमध्ये पुण्याचे अनिल वरपे यांचा समावेश आहे.शश्री. अनिल वरपे हे महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनचे सचिव असून रेफरी बोर्ड,टेनिक्वाईट फेडरेशन ऑफ इंडिया याचे अध्यक्ष आहेत. भारतीय संघ निवड समिती पुढीलप्रमाणे—
अध्यक्ष — बी.एस.नागराज,
कन्व्हेनर– श्री. ए . यादय्या
सदस्य — के.आर.व्ही.शामसुंदर, बी. मुरली, अनिल वरपे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading