Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

मिलिंद कुलकर्णी यांचा सर्वोत्कृष्ट निवेदक पुरस्काराने सन्मान

पुणे : ऑल आर्टिस्ट फाऊंडेशनतर्फे संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट निवेदक या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित फोटोत (डावीकडून) नीलिमा लोणारी, तृप्ती जाधव,अनुराधा शिंदे, मिलिंद कुलकर्णी,लीना नांदगावकर,अर्चना नेवरेकर आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर. 

मिलिंद कुलकर्णी यांनी सुगम संगीताचे भव्य कार्यक्रम, शास्त्रीय संगीताचे तालचक्र, स्वर झंकार, गानसरस्वती, वसंतोत्सव, ख्याल यज्ञ असे महोत्सव, साहित्य संमेलन, कवितांची मैफल, मान्यवरांशी संवाद अशा सर्व ठिकाणी निवेदन केले आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर, भारतरत्न पं.भीमसेन जोशी, उस्ताद झाकीर हुसेन, पं. हरिप्रसाद चौरसिया, विजय घाटे यांचे आशीर्वाद त्यांना मिळालेले आहेत. कवी मंगेश पाडगांवकर यांनी त्यांना दाद देताना असं म्हटलं आहे, ” प्रिय मिलिंद मला तुमच्या निवेदनाचा हेवा वाटला. कारण आज माझी कविता तुमच्या प्रेमात पडली आहे”. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2 कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणारे ते एकमेव सूत्रसंचालक आहेत. निवेदन, सूत्रसंचालन, निरूपण, प्रकट मुलाखत, रिॲलिटी शो चे संशोधन लेखन, ‘मोटीव्हेशनल स्पीकर’ आणि एकपात्री कार्यक्रम अशा 7 गोष्टी करणारा एकमेव कलावंत अशी मिलिंद कुलकर्णी यांची ओळख आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading