चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड
पुणे:राज्यातील महिलांचे प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या भाजप नेत्या चित्र वाघ यांच्यावर पक्षाने मोठी जबादारी सोपवली आहे.चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. बावनकुळे यांनी चित्रा वाघ यांना निवडीचे पात्र दिले आहे. पंकजा मुंडे यांना डावलून भाजपने चित्रा वाघ यांच्यावर पुन्हा एकदा एवढी मोठी जबाबदारी टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भाजपच्या महिला मोर्चाच्या विद्यमान अध्यक्ष उमा खापरे विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेल्यामुळे त्यांच्या जागी चित्रा वाघ यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे बक्षीस म्हणून चित्रा वाघ यांना हे पद देण्यात आल्याचे समजते. महिलांच्या सक्षमीकारणासाठी महिलांचे सगळे विषयांच्या ठिकाणी चित्रा वाघ पोहचतात. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करायची असो, त्यांना उत्तर देण्यासाठी चित्रा वाघ नेहमीच पुढे असतात. यासोबतच राज्यातील महिलांचे प्रश्न अत्यंत आक्रमकपणे मांडण्यात त्या अग्रेसर आहेत. त्यामुळेच पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
