Sunday, October 25, 2026
Latest NewsPUNE

वाडीया काँलेजसमोर रिपब्लिकन कामगार सेनेचे बेमुदत धरण आंदोलन सुरू

पुणे : सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार रिपब्लिकन कामगार सेना व माँडन एज्युकेशन सोसायटी शिक्षक शिक्षेकत्तर कर्मचारी संघाच्या वतीने वाडीया काँलेजमधील कर्मचारी वर्गाच्या न्याय हक्कासाठी वाडीया काँलेज समोर बेमुदत धरणे आंदोलन दि १ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू आहेत विनाअनुदानित शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ७ वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळावे ,

कुसरो वाडीया पाँलेटेक्निकल काँलेज मधील कर्मचाऱ्यांना १०० वेतन मिळावे ,संस्थेने अध्यक्ष/सचिव यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक बैठक होऊन कर्मचारी हितार्थ निर्णय घेण्यात यावे,वेळेत पदोन्नती व डिए मिळावे,अधिक कामाचे शासन निर्णयानुसार मोबदला मिळावा,संस्थेने रोस्टर पुर्ण करुण भरती प्रक्रिया राबवावी, संस्थेत शिक्षकांन मधील विश्वस्त निवड करताना निवडणूक प्रक्रियेव्दारे शिक्षक प्रतिनिधी निवडावे, शौचालय नियमित साफ करून विद्यार्थी व कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी,महाविद्यालयातील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात याव्या या प्रामुख्याने मागण्या करत काम बंद करुण कर्मचारी धरणे देत आहेत, आंदोलकांचे नेतृत्व युवराज बनसोडे ,प्रशांत सोनवणे ,राजेश कचरे ,विवेक बनसोडे हे करीत आहेत मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन चालू असणार असल्याचे त्यांच्यामार्फत सांगण्यात आले आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading