Wednesday, August 26, 2026
Latest NewsPUNE

पुन्हा एकदा क्लाईन मेमोरियल शाळेमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही म्हणून पालकांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घातला गोंधळ

पुणे : बिबेवाडी येथील क्लाईन मेमोरियल या शाळेमध्ये पालकांनी फी भरली नाही असे कारण सांगून ज्यांनी फी भरली अशांच्या पाल्यांना ही शाळेच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना बसून दिले नाही. ही परीक्षेला बसू न देण्याची तिसरी वेळ आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पालकांनी शाळेमध्ये गोंधळ घातल्यामुळे मुलांची चालू परीक्षेचे सुरू असलेले पेपर झाल्यानंतर आजचा राहिलेल्या विषयाची परीक्षा घेतली जाईल असे आश्वासन प्रशासनाने दिले. त्याच बरोबर येत्या 19 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता याबाबत बैठक घेतली जाईल, लॉकडाऊन मध्ये घेतलेली वाढीव फी ही कमी करावी ही देखील मागणी यावेळी करण्यात आली. तसेच वाढीव फी पालकांच्या नावे दाखवली जात आहे ती कमी करावी. विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी, पालकांना विश्वासात घेऊन निर्णय करावे परस्पर निर्णय लागू नये अशा प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना जर वारंवार आपण परीक्षेला बसू देणार नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी प्रशासनाने वरील विषयांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ तसेच प्रलंबित पालकांचे विषय मार्गी लावू असे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर त्या ठिकाणी पालकांचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या प्राध्यापक, लीगल ॲडव्हायझर, शिक्षक, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभेचे अध्यक्ष  संतोष नांगरे, मदन वाणी, प्रमोद कोठवळे, मंथन जागडे, राजू खैरे, चंद्रकांत गायकवाड,  शिव घाडगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading