राम कदम यांनी जनतेची माफी मागावी -युवक काँग्रेस
पुणे:राम कदम तुमचं ज्ञान तुमच्याकडेच ठेवा. ५०० रुपयांच्या नोटेवर स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो टाकत एक ट्विट केले आहे. तसच अखंड भारत… नया भारत… महान भारत… जय श्री राम… जय माता दी असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
छत्रपती शिवराय विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे पण शिवराया बरोबर आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर तुम्ही मोदींची तुलना करू शकत नाही या दोन महान व्यक्तींबरोबर मोदीच काय कुणाचीही तुलना होऊ शकत नाही भानावर या राम कदम. तुमच्या सारख्या लोकांमुळेच देश देशोधडीला लागणार.
आहो एखाद्या लहान मुलाला विचारलं ना तर तो सांगेल नोटांवर कोणाचा फोटो लावावा. तुम्ही तर कळते आहात. भारतातले महापुरुष राहिले बाजूला आणि तुम्ही मोदीचा फोटो लावा बोलताय. वा क्या बात
राम कदम यांनी त्वरित ट्विट डिलीट करून समस्त जनतेची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी केली आहे
