Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शिंदे व भाजपमधील त्यांचेच आमदार एकमेकांवर खोक्याचा आरोप करत आहेत -अजित पवार

पुणे : शिंदे गटातील व भाजपमधील काही मंत्री एकमेकांवर आरोप करतात. सत्ताधारी पक्षातील अर्ध्याहून नेते काय बोलतात, काय करतात, ते काहीच कळत नाही. त्यांचेच आमदार एकमेकांवर खोक्याचा आरोप करत आहेत. अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे व फडणीस सरकारवर केली.
अजित पवार म्हणाले,मंत्री जिल्हाधिकाऱ्यांना म्हणतात, तुम्ही दारू पिता का ? त्यांच्यात नक्की काय सुरू आहे कळत नाही. किराणाबाबतही जनतेची अशीच फसवणूक केली गेली आहे. कुठं तेल गेलं कळलंच नाही, आनंदाचा शिधा  लोकांपर्यंत पोहचलाच नाही. कुठे तेल पोहचलं तर रवा नाही, रवा पोहचला‌तर साखर नाही. त्यातही दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत असते असे म्हणून मंत्री नागरिकांची थट्टा करत आहेत. याप्रकरणी मंत्री व आमदारांना योग्य ती समज देणं अत्यंत गरजेचं आहे. असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले,पुण्यातल्या एअरबससंदर्भात मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितिनं 8 सप्टेंबर 2021 ला 295 विमान खरेदी करण्याची परवानगी दिली होती. हे केंद्र सरकारचं सांगतोय. दिवाळीला मी बारामतीला होतो. जनता पाहते तशा मिही बातम्या पाहतो. लष्करी विमानं निर्माण करणारी उत्तर प्रदेश हे भाजपशासित राज्यात प्रयत्न होते, अशी माहिती त्यांनी दिली. भाजप पक्षाचे नेते प्रसाद लाड यांनी ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याचं खापर तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि महाविकास आघाडीवर फोडलं आहे.
प्रसाद लाड यांनी आरोप केलाय. चौकशी करा, होऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी. असे अजित पवार म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासोबतच गणपती बाप्पा आणि लक्ष्मी यांचे फोटो असावेत अशी मागणी मोदी सरकारकडे केली आहे.यानंतर आता भाजपच्या आमदारांकडूनही नोटांवर फोटो लावण्यासाठी पर्याय सुचवले जात आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवरायांचा फोटो चलनी नोटांवर असावा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार राम कदम यांनी तर कोणत्या महापुरूषांचे फोटो नोटांवर असावेत त्याचे पर्यायच दिले आहेत.लक्ष विचलित करण्यासाठी काहीतरीच काढतात नोटेवर लक्ष्मी आणि गणपती चे चित्र हे कुणाला तरी पटतंय का? असे अजित पवार म्हणाले.
दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल असे विरोधी पक्ष विचारत आहे. त्यावर मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे. शिंदे सरकारमधील काही मंत्री राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत अशी चर्चा आहे त्यावर अजित पवार म्हणाले,शिंदे सरकारमधील कोण नाराज कोण नाही याविषयी मला काही माहिती नाही. असे अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading