Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळाच्या स्मारकपूर्व कामाचा शुभारंभ

पुणे : संगमवाडी येथील क्रंतिगुरू लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारकाच्या सीमा भिंत रस्ता, जमिन लेवलिंग, साफसफाई , सुरक्षा व्यवस्था या कामाचा शुभारंभ आज राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष मा. प्रशांत जगताप तसेच माजी गृहराज्यमंत्री व मातंग समाजाचे नेते रमेशदादा बागवे यांच्या शुभहस्ते पाडव्याच्या शुभमुहुर्तावर संपन्न झाला.यावेळी क्रंतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती महाराष्ट्र शासन अध्यक्ष विजयबापू डाकले यांनी आयोजन केले होते .
गेली अनेक दशके समाजाने व लहुप्रेमींनी खूप संघर्षकरून, प्रयत्न करून सुद्धा या समाधीस्थळाच्या कामाचा निर्णय होऊ शकला नव्हता. पण आदरणीय अजितदादांच्या सकारात्मक प्रयत्नामुळे महाविकास आघाडी सरकार असताना हा निर्णय झाला. विजयबापु डाकले सारख्या कार्यक्षम आणि समाजहित जपणा-या कार्यकर्त्याची समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी सहकारी सदस्यासह सरकार दरबारी प्रचंड पाठपुरावा केला. निधी आणला, जागा संपादीत करुन घेतली याबरोबरच संबंधीत ईतर कामे व्हावीत म्हणुन सतत कामाचा धडाका लावला. महाविकास आघाडी सरकारने स्मारकाच्या भुसंपादन कामासाठी तब्बल ८८ कोटी रुपये पुणे महानगरपालिकेस वर्ग देखील केले. जागेचे भुसंपादन झाले यामुळेच आजचे भूमिपूजन होऊ शकले.
या सर्व बाबींची माझ्या मातंग समाजातील समाजबांधव तसेच आद्यक्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे प्रेमी कायम नोंद ठेवतील याची मला खात्री आहे. आज या प्रसंगी रमेश बागवे आनि प्रशांत जगताप यांनी समितीचे अध्यक्ष विजयबापु डाकले तसेच समिती सदस्य बाळासाहेब भांडे, रवी पाटोळे, राम कसबे, डॅा. राजु आडागळे , शांतीलाल मिसाळ यांचे विशेष कौतुक केले. यावेळी अनिलराव हातागळे , राजु साने, आरपीआय युवक अध्यक्ष विरेन हनुमंत साठे, सचिन डाकले, अक्षय शिंदे हे मान्यवर हजर होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading