माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत अण्णा नाईकची एन्ट्री
प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा सुरु झालेली माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत सद्धया अनेक ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळतायत. मालिकेत नुकतीच अनुष्काची एन्ट्री झाली ह्यात प्रार्थनाचा बदललेला लुक प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे. आता या मालिकेत जयंतीलाल मेहेताची एन्ट्री होणार आहे, आता हे जयंतीलाल मेहेता कोण? आणि अनुष्का सोबत त्याचा काय संबंध आहे हे येणाऱ्या भागात कळणार आहे. जयंतीलाल मेहेताचा भूमिकेत रात्रीस खेळ चाले मालिकेत अण्णा नाईकांची भूमिका गाजवणारे जेष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर असणार आहेत. आता जयंतीलाल यांच्या येण्याने यशच्या आयुष्यात काय घडणार हेच बघणं औत्सुक्याच ठरणार आहे.
तेव्हा पाहायला विसरू नका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.ग
