Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

PMPML – विशेष कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर ओम प्रकाश बकोरिया यांची शाबासकीची थाप

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांचे हस्ते व परिवहन महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पोतदार- पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व विभाग प्रमुख व विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

विशेष कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती खालीलप्रमाणे :
१) तानाजी कांबळे, कंडक्टर व अय्याज शेख, ड्रायव्हर (स्वारगेट डेपो)
दोन वर्षांपूर्वी रात्रीच्या वेळेस भर पावसात सिंहगड रस्त्यावर पाणी वाहत असल्यामुळे प्रवाशांना धीर देत रात्री उशिरा पर्यंत पाणी ओसरण्याची वाट पाहत थांबले होते व पाणी कमी झाल्या नंतर बस मार्गस्थ केली. सर्व प्रवाशांना पहाटे ४ च्या सुमारास सुखरुप धायरी बस स्टॉपवर पोहोचवले.
२) विशाल मासुळे, कंडक्टर (स्वारगेट डेपो)
 कोरोना कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी बस सेवा चालू होती. त्यावेळेस गर्भवती महिला प्रवाशास मार्ग बदल करून दवाखान्यात नेले. (अशा २ घटना)
 त्याचप्रमाणे भांडणात अडकलेल्या युवकाचे प्राण वाचवुन गाडी पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
 कोरोना काळात मनपा मध्ये प्रतिनियुक्तीवर असताना कोरोना योद्धा म्हणून काम केले.
३) संजय कदम, कंडक्टर (कोथरुड डेपो)
कात्रज ते कोथरुड डेपो मार्गावर काम करत असताना प्रवासात विसरलेली बॅग ज्यामध्ये जवळपास रोख रक्कम रूपये 2 लाख व महत्वाची कागदपत्रे होती, अशी बॅग सापडली. सदरची बॅग डेपो मध्ये जमा केली.
४) तानाजी देडे, ड्रायव्हर व परमेश्वर पाटील, कंडक्टर (बालेवाडी डेपो)
कोरोना कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी बस चालु असताना गर्भवती महिला प्रवेशास मार्ग बदलुन दवाखान्यात घेऊन गेले.
५) नागनाथ ननावरे, कंडक्टर व अरुण शंकर दसवडकर, ड्रायव्हर (कात्रज डेपो)
सासवड ते कात्रज रात्री उशिरा एक महिला प्रवाशी तिच्या लहान मुला सोबत बसमधून प्रवास करत होत्या. त्यांचा स्टॉप आल्यानंतर (रात्री ११.४५ च्या दरम्यान) त्या बसमधून उतरल्या मात्र त्यांना नेण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील कोणीही आले नव्हते. एकंदर परिस्थिती विचारात घेऊन दोन्ही सेवक त्यांच्यासाठी तिथे थांबून राहिले व सदर महिला प्रवाशी सुखरूप घरी पोहोचेल याची दक्षता घेतली.
६) दिपक कोर, कंडक्टर व शुभम मोरे, ड्रायव्हर (भोसरी डेपो)
मार्गावर काम करत असताना एका प्रवाशाचा १७०००/- हजार रुपये किंमतीचा मोबाईल सापडला. सदरचा मोबाईल प्रवाशास परत केला.

याप्रसंगी बोलताना ओम प्रकाश बकोरिया म्हणाले, “कर्मचाऱ्यांनी केलेल्या विशेष कामगिरीची करावी तेवढी स्तुती कमीच आहे. आजच्या परिस्थितीत हे अकल्पनीय आहे. अशा चांगल्या कामांमुळे समाजामध्ये चांगला संदेश जाऊन पीएमपीएमएलचा लौकिक या कर्मचाऱ्यांनी वाढवला आहे. आज सत्कार झाला फक्त तेच नाही तर असे अनेक कर्मचारी असतात जे चांगली कामे करून संस्थेच्या नावलौकिकात भर टाकत असतात. यापुढे विशेष कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार आहे. पीएमपीएमएलचे कर्मचारी जे कष्ट करतात यामध्ये त्यांच्या कुटुंबियांचे देखील मोठे योगदान आहे.”

सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पोतदार-पवार म्हणाल्या,“पीएमपीएमएलचे कर्मचारी कुठलेही काम अत्यंत जबाबदारीने व प्रामाणिकपणाने पार पडतात. कोरोना काळात पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत उत्तम काम केले. तसेच ज्याला माणसांची मनं कळतात, जे संवेदनशील असतात तेच अशी चांगली कमी करतात, असे गौरवोद्गार त्यांनी विशेष कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल काढले.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading