Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

विनायक निम्हण यांच्या कुटुंबियांचे आदित्य ठाकरे यांनी केले सांत्वन

पुणे: माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. निम्हण हे 1999 ते 2014 अशी 15 वर्षे शिवाजीनगर मधून आमदार होते. यातील पहिल्या दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते आणि नंतरचे पाच वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रीय व सामाजिक वर्तुळाची हाणि झाली आहे.आज युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विनायक निम्हण यांच्या कुटुंबांचे सातवण करून त्यांची विचार पूस केली आहे. यावेळी त्यांच्याबरोबर विधानसभेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे,व पुणे शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही काल ज्येष्ठ शिवसैनिक जुना सहकारी आणि एक चांगला माणूस काल गमावला.काल बातमी कळली आणि सुरवातीला हे खोटं असल्यासारखं वाटलं.त्यांच्या परिवारासोबत नेहमी आमचे चांगलें संबंध आहेत.
आम्ही कायम त्यांच्या सोबत आहोत. असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading