Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Parbhani – मालगाडीचे तीन डबे रूळावरून घसरले

परभणी : येथील रेल्वेस्थानकावर तीन नंबर फलाटाच्या बाजुच्या रेल्वेपटरीवर मालगाडी घेत असताना या मालगाडीचे तीन डबे रूळावरून घसरल्याची घटना सोमवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी रोजी दुपारी ५ वाजताच्या सुमारास घडली. रूळावरून घसरलेले मालगाडीचे डबे उचलण्यासाठी पुर्णा येथून दुर्घटना राहत गाडी परभणीत दाखल झाली आहे. पुर्णेहून आलेल्या पथकातील जवळपास ४० ते ५० कर्मचा-यांच्या पथकाने रूळावरून घसरलेले डबे उचलण्यासाठी प्रयत्न काम सुरू केले आहे.

येथील फलाट क्रमांक ३ वर मालगाडी उभी होती़ ही मालगाडी फलाट क्रमांकच्या तीनच्या बाजुच्या रूळावर दुपारी घेण्यात येत होती. ही मालगाडी कृषी विद्यापीठाच्या दिशेने नेवून पाठी मागे घेत असताना या मालगाडीचे तीन डबे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारा जवळ रूळावरून घसरले. या अपघाताची माहिती समजताच वरीष्ठ अधिका-यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली़ रूळावरून घसरलेले डबे उचलण्यासाठी पुर्णा येथून दुर्घटना राहत गाडी परभणीत दाखल झाली असून कर्मचा-यांनी डबे उचलण्याचे काम सुरू केले आहे़ या घटनेत मालगाडीच्या डब्ब्यांचे नुकसान थोडेफार नुकसान झाले आहे. दरम्यान ही मालगाडी फलाट ३ क्रमांकाच्या बाजुच्या रूळावर घसरली असल्याने याचा कोणताही परीणाम रेल्वे वाहतुकीवर होण्याचे नसल्याचे समजते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading