Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मी काय म्हातारा झालोय का? शरद पवार यांच्या मिश्किल टिपणीमुळे सभेत एकच हशा

पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार आज पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका दौऱ्यावर आहेत. पुरंदरमधील परींचे गावात शेतकरी सन्मान मेळाव्यात एका कार्यकर्त्यांनी साहेब आपले वय झाले एका जागेवर बसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश द्या. गावोगावी फिरू नका ,अशी विनंती केली होती. त्यावर शरद पवारांनी त्या कार्यकर्त्याचीच फिरकी घेत तुम्हाला कुणी सांगितलं मी म्हातारा झालोय. तुम्ही काय बघितलंअसं म्हणतात. सभेत एकच हशा पिकला.

अतिवृष्टी झाल्यानंतर राज्य सरकार योग्य उपाययोजना करताना करायला पाहिजे ती उपाययोजना करताना सरकार दिसत नाही. ज्यांच्या हातात केंद्राची सूत्रे आहेत. ते ग्रामीण भागातील लोकांसाठी काहीतरी ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. जेव्हा माझ्याकडे केंद्राची सूत्र आली तेव्हा शेतकऱ्यांची 72 हजार कोटींची कर्ज माफी आम्ही केली. जेव्हा अधिवेशन असेल तेव्हा तुमचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी उपयुक्त ठरतील म्हणून मी इथे शेतकऱ्यांसोबत संवाद करण्यासाठी आलो आहे.’असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, पुरंदरमधील लोकांनी मला खूप प्रेम दिलं. पुरंदरचे लोक आधी गिरणी कामगार म्हणून जायचे. आता तशी परिस्थिती नाहीय. शेतीचे प्रश्न सुटले नव्हते म्हणून सन्मानाने जगण्यासाठी पुरंदरमधील लोकांनी विविध व्यवसाय केले. आता इथे लोक शेती करू लागले आहेत. व्यवसाय करू लागले आहेत. आधी लोकांना भेटायचं म्हटलं तर रोजगार हमीची काम सुरू करा अशी मागणी व्हायची. आता कारखान्याची मागणी करीत आहेत. असे शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालं आहे. यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी आवश्यक धोरण स्वीकारले जात नाही. राज्यातील नुकसानीबाबत केंद्र आणि राज्य सरकारला माहिती देणार. पुरंदर तालुक्याचं चित्र बदलत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने मी आलो तुम्ही कधी मला मोकळ्या हाताने पाठवलं नाही. तुमची साथ प्रत्येक निवडणुकीत लाभली. असं शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading