Friday, October 23, 2026
ENTERTAINMENTLatest News

रावसाहेबांच्या विरोधात जाऊन सारंग मुक्ताचा हात हातात घेणार?

दार उघड बये ही मालिका सध्या प्रेक्षकांना खूप भावतेय ह्या मालिकेत सध्या खूप ट्विस्ट पाहायला मिळतायत सारंग आणि आर्याच्या साखरपुड्याच्या दिवशी आज्जी सारंगला सांगते कि मुक्ता कशी ह्या कुटुंबासाठी योग्य मुलगी आहे आणि जर तिच्यावर खरं प्रेम असेल तर तुझ्या मनाला जे योग्य वाटतं ते तू कर. सारंग आर्याबरोबर साखरपुड्याला आणि लग्नाला नकार देतो. आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन तो मुक्ताचा हात धरून  तिला देवीसमोर उभं करतो आणि तिच्या कपाळात कुंकू भरतो. सारंग ने असा केल्याने सर्व आश्चर्यचकित होतात  ह्या  कृत्यामुळे रावसाहेब भयंकर चिडतात. हे पाहून मुक्ता माणुसकीच्या भावनेने मध्ये पडते. दुसरीकडे देवीच्या उत्सवात संबळ वाजवला त्याचे पैसे रावसाहेबांनी न दिल्याने मुक्ता  नगरकरांना जाब विचारते. जोपर्यंत  नगरकर पैसे देत नाही तोपर्यंत  मुक्ता संबळ वाजवून देवीचा गोंधळ घालते. रावसाहेब मुक्ताला घरातून निघून जायला सांगतात. एकीकडे आजी सारंगला सांगते की प्रेम असेल तर मुक्ताला परत ह्या घरात घेऊन ये. आता सारंग रावसाहेबांच्या विरोधात जाऊन मुक्ताला परत घरात घेऊन येईल?  त्यासाठी पाहायला विसरू नका ‘दार  उघड  बये ‘ सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading