fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीताचे सादरीकरण करून आणि साखर वाटून शासनाचे अभिनंदन

पुणे : ‘जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत ऐकताच महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला एक वेगळेच स्फुरण चढते. महाराष्ट्राची महती सांगणाऱ्या या गीताला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा देणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत आणि अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शाहिरांच्या वतीने शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचे सादरीकरण केले. यावेळी पुणेकरांना साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

फर्ग्युसन रस्त्यावरील कलाकार कट्टा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे सचिव अरुण कुमार बाभुळगावकर, प्रा. संगीता मावळे उपस्थित होते. होनराज मावळे यांनी संगीत संयोजन केले. सक्षम जाधव यांनी ढोलकी तर होनराज मावळे यांनी हार्मोनियमवर साथसंगत केली.

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, श्रीनिवास खळे यांचे संगीत स्व. राजा बढे यांची रचना व पद्मश्री शाहीर साबळे यांनी गायलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचे राज्यगीत असा दर्जा देणार असल्याची घोषणा केली. शाहीर साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा सर्व शाहिरांना अभिमान वाटत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading