Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे रेल्वे स्थानकावरील त्या प्रवाशाचा मृत्यू चेंगराचेंगरी मुळे नाही, पोलिसांचा खुलासा

पुणे:दिवाळीनिमित्त काल राज्याभरातील नागरिकांनी गावी जाण्यासाठी एसटी स्टॅंडसह रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी केली होती. याच गर्दीमुळे पुण्यातील रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीत गाडीमध्ये चढणाऱ्या साजन बलदेवन या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची बातमी काल समोर आली होती.
साजन बलदेवन याचा मृत्यू चेंगराचेंगरीत मृत्यु झाला नसून, दम्याच्या आजारामुळे सदर प्रवाशाचा मृत्यू झाला असल्याचा दावा पुणे रेल्वे विभागाने केला आहे. साजन बलदेवन हा काल पुणे दानापूर एक्सप्रेसने प्लॅटफॉर्म नंबर एक वरून बिहारला जाणार होता.
बिहारला जात असताना त्याची प्रकृती रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच अतिशय खालावली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचा दावा पुणे रेल्वे विभागाने केला आहे. साजन बलदेवन सोबत असलेल्या त्याच्या इतर सहकारी मित्रांनी देखील त्याला दम्याचा आजार असल्यास पोलीस पुणे रेल्वे पोलीस विभागाला कळवल आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading