Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

दिव्यांग सैनिकांना दिवाळीनिमित्त ‘सांगितिक मेजवानी आणि फराळ’

पुणे : देशासाठी लढताना अपंगत्व आलेल्या सैनिकांसाठी दिवाळीनिमित्त ‘गीतों का सफर’  हा सांगितिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जितेंद्र भुरुक यांनी किशोर कुमार यांची गाणी सादर करीत सैनिकांना जुन्या काळाची सफर घडवून आणली. सैनिकांनी देखील कार्यक्रमाचा आनंद घेत उत्स्फूर्त दाद दिली.

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग आणि कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट  यांच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सैनिक बांधवांसाठी खडकी येथील क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे जितेंद्र भुरुक प्रस्तुत ‘गीतों का सफर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री महालक्ष्मी मंदिराच्या विश्वस्त अमिता अग्रवाल, कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे  अध्यक्ष ॲड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, प्रवीण चोरबेले, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, शिरीष मोहिते, ऋषीकेश मोरे  आदी उपस्थित होते. कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे यंदा १२५ वे वर्ष सुरू आहे.

यावेळी खडकी येथील पॅराप्लेजिक रिहॅब सेंटर मधील अपंग सैनिकांना फराळ देखील देण्यात आला. दिवाळीनिमित्त दिलेला फराळ स्वीकारताना सैनिक भारावून गेले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading