Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

आदिवासी बांधवांना ‘दिवाळी किट’ चे वाटप करुन प्रशासनाच्यावतीने दिलासा

पुणे : जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार सिंहगड भागातील कातकरी वस्ती येथील आदिवासी बांधवांना
अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्या उपस्थितीत नवीन शिधापत्रिका व ‘आनंदाचा शिधा’ दिवाळी किट वाटप करण्यात आले.

नवीन शिधापत्रिका व दिवाळी किट मिळाल्याने आदिवासी बांधवांसाठी दिवाळीचा सण विशेष ठरला. या सर्व नागरिकांनी प्रशासनाला धन्यवाद दिले.

यावेळी परिमंडळ-म विभागाचे पुरवठा निरीक्षक चांगदेव नागरगोजे, डोणजे गावचे पाटील दिलीप पायगुडे, रास्तभाव दुकानदार नंदू जावळकर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading