fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

२० वर्ष तुमची मुंबई पालिकेत सत्ता होती तुम्ही काय केल ?चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला सवाल

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली आहे. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील व्यवस्थेचाही बोजवारा उडाला. पुण्यातील पूरस्थितीवरून विरोधकांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज सामना अग्रलेखातूनही पुण्यातील पुरस्थितीवरून भाजपच्या स्मार्टसिटी योजनेवर ताशेरे ओढत शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे राजकारण तापले आहे.भाषा वरुन कळते की तो सामना चाअग्रलेख आहे. जेपाणी साचत पण मी पुणेकरांची दिलगिरी देखिल व्यक्त केली .तुम्ही जबाबदारी झटकली.पण २० वर्ष तुमची मुंबई पालिकेत सत्ता होती तुम्ही काय केल असा सवाल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला सवाल पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला हेमंत रासने ,माजी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांची वर्णी न लागल्यामुळे सांगोल्यातील बापू समर्थकांमध्ये मोठी निराशा निर्माण झाली आहे. मी आज दिवसभर मी टीव्ही नाही बघितली व्हाट्सअप चेक नाही केला मी बघून तुम्हाला सांगतो. असे वक्तव्य पाटील यांनी केले. 
चंद्रकांत पाटील म्हणाले,पुण्याचा पालकमंत्री झाल्या नंतर मी सगळ समजून घेण्यासाठी सगळ्या सरकारी कार्यालयंना भेट देत आहे.याआधी जिल्हा परीषद, दोन्ही महापालिका,pmpl अशा सगळ्या संस्थांना मी भेट दिली आहे.आणी आज पोलीस आयुक्तालयात आलो आहे.१नोव्हेंबर पासुन पालकमंत्री काम सुरु करणार, फील्डवर जाऊन सगळा आढावा घेणार आहे. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पुणे हद्दीत सात नवीन पोलीस स्टेशन चालू होणार होती पण ती अजून काही चालू झाली नाही. त्यावर हद्दीत ७ नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव, अर्थखात्यकडे पडला आहे. त्याचा पाठपुरावा करणार. असे पाटील म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी घाईघाईने कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली होती. या कामांना विद्यमान राज्य सरकारने स्थगिती दिली. जिल्हा परिषदेतील अनेक विकास कामे घाईघाईने सुरू केली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्टे देखील दिला आहे.माझी यंत्रणा ही सगळी कामे चेक करणार आणि मगच परवानगी देणार. मी कुठलीही विकास कामे थांबवणार नाही . असे चंद्रकांत पाटील म्हणाले.


Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading