fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsSports

व्ही. व्ही. नातू स्मृती बॅडमिंटन स्पर्धा – कौशल धर्मामेर अंतिम फेरीत

पुणे: महाराष्ट्राच्या कौशल धर्मामेरने पुणे जिल्हा अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना आयोजित वरिष्ठ गटाच्या व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

शिवाजीनगर येथील मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा सुरू आहे. शनिवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत बिगरमानांकित कौशल धर्मामेरने आंध्र प्रदेशच्या जगदीश के.वर २१-१६, २१-१७ अशी मात केली. सुरुवातीला दोघांमध्ये गुणांसाठी चुरस बघायला मिळाली. मात्र, नंतर कौशलने जगदीशला फारशी संधीच दिली नाही. दुसऱ्या  गेममध्ये जगदीशने आव्हान राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्याला यश आले नाही. तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीत कौशलने आठव्या मानांकित तेलंगणच्या प्रणव राव गंधमला २१-१७, २१-१५ असे, तर जगदीशने केरळच्या मुनावर महंमदला २१-१५ , १३-२१, २१-१५  असे पराभूत केले होते. कौशलची रविवारी विजेतेपदासाठी रोहन गुरबानी आणि भार्गव एस. यांच्यातील विजेत्याशी लढत होईल.उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या रोहन गुरबानीने पात्रता फेरीतून आलेल्या हर्षिल दाणीची विजयी घोडदौड २१-१६, १७-२१, २१-१९ अशी रोखली. कर्नाटकाच्या भार्गव एस.ने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळालेल्या पुण्याच्या वरुण कपूरला २१-१५ , २१-१५ असे नमविले.

मालविका-पूर्वा आमनेसामने
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित मालविका बनसोडने महाराष्ट्राच्याच मधुमिता नारायणला २१-१९, २१-७ असे नमविले. तिसऱ्या मानांकित पूर्वा बर्वेने आपली आगेकूच कायम राखताना पात्रता फेरीतून आलेल्या कर्नाटकाच्या प्रेरणा शेटला २१-६, २१-१० असे सहज नमवून बॅडमिंटनचे धडे दिले. गुजरातच्या अदिती रावने चौथ्या मानांकित कर्नाटकाच्या तनया हेमंतला ८-२१ ,२१-९ , २१-१७ असा पराभवाचा धक्का दिला. उत्तर प्रदेशच्या मानसीसिंगने दुसऱया मानांकित तारा शहाचे आव्हान २१-१३, १४-२१, २१-१७ असे परतवून लावले.

निकाल –

उपांत्यपूर्व फेरी – मिश्र दुहेरी – दीप रामभिया-रम्या वेंकटेश वि. वि. छायानित जोशी-नरधाना व्ही. आर. २२-२०, २१-१९, अरविंद व्ही. सुरेश-पवित्रा नवीन वि. वि. नवनीत बोक्का-प्रियादेवी कोंजेंगबाम २१-१६, १२-२१, २१-१७, सिद्धार्थ एलान्गो-खुशी गुप्ता व. वि. महंमद रेहान आर-अनीस कोवसर जे. २१-१४, २१-१९, गाउस शेख-मनीषा के. वि. वि. नितीन एच. व्ही-पूर्विशा एस. राम ११-२१ , २१-१७, २१-१९.

महिला दुहेरी –शिखा गौतम-पूर्विशा एस. राम वि. वि. ऋतुपर्णा पांडा-स्वेतपर्णा पांडा २१-१७, २१-१३, अनुषा सी. एस.-रीवा एव्हान्गेलिन वि. वि. महेक नायक-हरिका व्ही. २१-१८, २१-१०, खुशी गुप्ता-प्रियादेवी वि. वि. दीक्षा चौधरी-नवधा मंगलम २१-१३, २१-१५, मनीषा के.-कनिका कन्वल वि. वि. वैष्णवी खांडकेकर-रिधीकौर तूर २१-१३ ,२१-१२.

पुरुष दुहेरी – हरिहरन अमसाकारुनन-रुबनकुमार आर. वि. वि. कुशल राज एस.-प्रकाश राज एस. २१-१७, २१-१९, मंजितसिंग ख्वैराकपम-डिंगूसिंग कोंतथोयूजम वि. वि. तुषार शर्मा-विनयकुमार सिंग १९-२१ , २१-१५, २६-२४, विप्लव कुवळे-विराज कुवळे वि. वि. चंद्रकुमार डी.-ब्रिजेश यादव २१-१९, ८-२ (निवृत्त), महंमद अमन-यश राइकवार वि. वि. अंजन बरगोहॉइन-रंजन बरगोहॉइन २३-२१, २१-१७

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading