fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार हा भाजपने सोडलेला फुसका बार -सुषमा अंधारे


पुणे:उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जाणारेमिलिंद नार्वेकर बऱ्याच दिवसापासून ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी नाराज असल्याचं मी सुद्धा ऐकतो आहे. असं विधान केलं आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार हा भाजपने सोडलेला फुसका बार आहे. अशी टीका सुषमा अंधारे यांनी भाजप वर केली आहे.

यावेळी सुषमा अंधारे यांनी केंद्रीय नारायण राणे यांच्यावरही टीका केली. राणे पिता पुत्रांबद्दल मला फार गांभीर्याने काहीच मांडावं असं वाटत नाही. राणे यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना मैदानात येता येणार नाही. त्यांना पव्हेलियनमध्येच बसून राहावे लागेल. कोण ठाकरे? असं विचारता पण त्याच ठाकरेंनी तुमची कुवत नसताना सुद्धा तुम्हाला एवढ्या मोठा पदावर बसवलं. याच ठाकरेंमुळे आणि याच मातोश्रीमुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचला. नाहीतर ठाकरे नसते तर नारायण राणे कणकवली लिमिटेड कंपनी इतकचं मर्यादित असते.असा हल्लाही त्यांनी चढवला.
सुषमा अंधारे म्हणाल्या,दिवाळी असल्याने काही लवंगी मिरच्या तडतड करत आहेत. काही छोट्या छोट्या फुलबाज्या सुध्दा आपली चमक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही फुसके बार देखील होत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading