fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

भोसरी जमीन खरदी-विक्री प्रकरणी एकनाथ खडसे यांची पुन्हा चौकशी होणार

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. पुण्यातील भोसरी जमीन खरदी-विक्री प्रकरणाच्या गैरव्यवहाराबाबत जिल्हा सत्र न्यायालयाने फेरतपासाचे आदेश पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिल्याची माहिती समोर येत आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाने येथील बंद गार्डन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश दिल्याचे समजते. याप्रकरणात शासनाच्या वतीने नाशिकचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते.
जिल्हा सत्र न्यायालयाने याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला फेरतपास करण्याचे आदेश दिले आहे. तत्कालीन तपासी अधिकारी यांनाही याबाबत सविस्तर अहवाल सादर करावा लागणार आहे. तसेच, एसीबी पुणेच्या तपासी अधिकऱ्यांना 31 जानेवारी 2023पर्यंत अंतीम अहवाल सादर करण्यास सांगितल्याचे समजते. सहायक पोलीस आयुक्त सीमा आडनाईक यांच्याकडे हा तपास सोपविण्यात आला आहे.
खडसे महसुल मंत्री असताना पुण्याजवळील भोसरी येथील एमआयडीसीमधील तीन एकराचा भुखंड खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. भुखंडाची खरेदी त्यांनी पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांच्या नावे करण्यात आली होती. त्यावेळी भुखंडाचे बाजार भावानुसार मुल्यांकन अधिक असताना ते कमी किंमतीत खरेदी केले. तसेच शासनाची स्टॅम्प ड्यूटीदेखील भरण्यात आली नव्हती, असा आरोप फिर्यादीकडून करण्यात आला होता.
याप्रकरणी आता फिर्यादीने पुन्हा न्यायालयाकडे अर्ज केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, या अर्जात हा व्यवहार खोटा असल्याचा दावा करण्यात आला. हा अर्ज न्यायालयाकडे प्रलंबित होता, त्यामुळे न्यायालयाने अर्ज विचारात घेतला. शासनाकडून या प्रकरणात मिसर यांच्याकडून बाजू मांडण्यात आली. पुणे येथील न्यायालयात मिसर यांनी चौकशीची परवानगी महिनाभरापुर्वी मागितली होती, याबाबत तीन दिवस जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी मिसर यांनी उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत केलेले भाष्यही न्यायालयात मांडले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading