fbpx
Friday, April 19, 2024
BusinessLatest News

टायटन कंपनीने IRTH बॅग्स लॉन्च करून नवीन लाइफस्टाइल कॅटेगरीमध्ये पाऊल ठेवले

पुणे :  ग्राहकोपयोगी उत्पादनांमध्ये निर्विवाद अग्रणी मानल्या जाणाऱ्या टायटन कंपनीने आपला नवा ब्रँड सादर केला आहे – IRTH! IRTH एक विमेन हॅन्डबॅग ब्रँड आहे. टायटन कंपनीने सखोल विचारांती हा ब्रँड डिझाईन केला आहे.

आजच्या काळात प्रत्येक महिलेसोबत एक बॅग असते आणि त्याशिवाय त्यांच्याकडे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स असतातच. विमेन हॅन्डबॅग बाजारपेठेत अनेक संधी व क्षमता उपलब्ध असल्या तरी सध्याची उत्पादने एका विशिष्ट श्रेणीच्या महिलांसाठी बनवली गेली आहेत. टायटनला असे आढळून आले आहे कीऑर्गनाइज्ड स्टायलिंगमध्ये अनेक संधी आहेतपण या क्षेत्रात आजवर कोणी जास्त काम केलेले नाही. टायटनच्या महिला ग्राहकांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीचा प्रत्येक दिवस जास्तीत जास्त चांगला असावा या उद्देशाने ब्रँडने हे पुढचे पाऊल उचलले आहे.

आधुनिक महिलेचा प्रत्येक दिवस जास्तीत जास्त चांगला असावा असा विचार करूनया बॅग्स डिझाईन करण्यात आल्या आहेत. किफायतशीर किमतींमध्ये प्रीमियम क्वालिटी मिळवून देण्यासाठीग्राहकांची आवडनिवड व गरजा समजून घेऊन या बॅग्स डिझाईन केल्या आहेत.

टायटनचा नवा मोठा ब्रँड IRTH महिलांसाठी एक असा बॅग ब्रँड प्रस्तुत करत आहे, जो विश्वसनीय आहे आणि आजच्या काळातील सर्व गरजा पूर्ण करतो. या लॉन्चवर प्रतिक्रिया व्यक्त करताना टायटन कंपनी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर सी के वेंकटरमण यांनी सांगितले, “आपल्या उत्पादनांमधून ग्राहकांना मिळणारा अनुभव सातत्याने वृद्धिंगत व्हावा यासाठी टायटनने आपल्या सीमा सतत रुंदावल्या आहेत. आम्ही पाहिले आहे की, विमेन बॅग्स कॅटेगरीमध्ये खूप क्षमता आहेत आणि IRTH सुरु करून या क्षमतांचा लाभ घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ब्रँड IRTH टायटनची मूल्ये व विश्वास दर्शवतो. तसेच हा ब्रँड महिला ग्राहकांची आवडनिवड आणि आजच्या काळातील त्यांच्या गरजांबाबत आमची सखोल समज देखील दर्शवतो.  डिझाईन आणि उपयुक्तता यांना प्रमुख मानणारा एक ब्रँड आम्ही प्रस्तुत करत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.”

टायटन कंपनी लिमिटेडच्या फ्रॅग्रन्स आणि फॅशन ऍक्सेसरीज डिव्हिजनचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि व्हाईस प्रेसिडेंट मनीष गुप्ता म्हणाले, “आपल्या ग्राहकांसोबत दीर्घकालीन, सार्थक संबंध प्रस्थापित करणे आणि त्यांच्या खरेदी प्रक्रियेला जास्तीत जास्त रोचक व विशेष बनवणे हा IRTHचा उद्देश आहे. ब्रँडचे नाव IRTH प्रॉडक्ट डिझाईनमधील बारकावे आणि काळजीपूर्वक करण्यात आलेले डिझायनिंग दर्शवते. ब्रँडमध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या आश्चर्य आणि भावना देखील यामधून दर्शवल्या जातात.”

IRTHच्या प्रॉडक्ट पोर्टफोलिओमध्ये वर्कबॅग्स, टॉल टोट्स, शोल्डर बॅग्स, हॅंडहेल्ड्स, स्लिंग्स, क्रॉस बॉडी, क्लचेस आणि वॉलेट्स आहेत. डिलाइट्स आणि ऑर्गनायजर्स या अनोख्या कॅटेगरीज IRTH मध्ये आहेत.

डिलाइट्स ही स्पेशल बॅग्सची रेंज आहे. काही विशेष गरजांना अनुसरून तयार करण्यात आलेल्या बॅग्स जरी आज उपलब्ध असल्या तरी त्या सर्वात स्टायलिश नाहीत. डिलाइट्स श्रेणी एक नवा विभाग आहे ज्याची सुरुवात मॉम बॅग्सनी होते. मॉम बॅग्समध्ये मुलांच्या दुधाच्या बाटल्यांचा इन्स्युलेटेड स्लॉट्स, चेंजिंग मॅट्स, घाण झालेल्या कपड्यांसाठी वॉटर रिपेलंट स्लॉट्स आहेत, तसेच यामध्ये वेगळे करता येण्याजोगे (डिटॅचेबल) स्ट्रॅप्स आहेत, ज्यामुळे बॅग स्ट्रोलरला हुक्ड करता येते आणि आईचे हात मोकळे राहू शकतात. आई आणि बाळाच्या अनेक छोट्या-छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी छोटी पॉकेट्स यामध्ये देण्यात आली आहेत.

डिटॅचेबल ऑर्गनायजर्स क्लस्टर मोबिलिटी स्टायलिंग ऑर्गनाइज्ड करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.  लॉन्च पॅक चार वेगवेगळ्या आकारांमध्ये उपलब्ध आहे – S, M, L आणि XL, आपल्या गरजांनुसार त्यांचा वापर करता येतो.

IRTH बॅग्सची छोटी-छोटी वैशिष्ट्ये मोठा आनंद मिळवून देतात – पॅडेड शोल्डर्स, की होल्डर्स, वायर ऑर्गनायजर्स, डिटॅचेबल सॅनिटायजर पाऊच, डिटॅचेबल पाऊचेस इत्यादी वैशिष्ट्यांमुळे तुम्ही तुमच्या गुप्त गोष्टी गुप्त आणि मौल्यवान गोष्टी सुरक्षित ठेवू शकता. पॅक्ड IRTH बॅग्सच्या किमती खूपच किफायतशीर आणि प्रत्येक खिशाला परवडतील अशा आहेत – २५९५ ते ५९९५ रुपयांपर्यंत. IRTH मध्ये सुरुवातीला ९० बॅग्स आणि ४ ऑर्गनायजर्स असून, यामध्ये रंगांचे दोन पर्याय उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading