महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी देखील मध्यप्रदेशात येऊन गुंतवणूकदारांना आमंत्रण द्यावे – मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान
पुणे : फोक्सवॅगन वेदांत प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर विरोधकांमध्ये व सत्ताधाऱ्यांमध्येआरोप प्रत्यारोप झाले . महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी देखील मध्यप्रदेशात येऊन गुंतवणूकदारांना आमंत्रण द्यावे, असे आवाहन पुण्यातील पत्रकार परिषदेत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले आहे.
शिवराजसिंह चौहान २ दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत .तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला. चौहान म्हणाले,पुणे एक उद्योगशील शहर आहे. विशेषता पुण्यामधील ऑटोमोबाईल क्षेत्र, आयटी क्षेत्रामध्येजी प्रगती झालेली आहे. ती फार महत्त्वाची आहे. त्यामुळे या उद्योजकांना आम्ही आमंत्रित करत आहोत. पुण्यातल्या काही ऑटोमोबाईल्स, आयटी कंपनी विचारणा केलेली आहे .त्याचबरोबर सिंबायोसिस कॉलेजचा सुद्धा एक प्रोजेक्ट आहे. ऑटोमोबाईल आयटीमध्ये विशेष काही इलेक्ट्रॉनिकच्या संदर्भात चर्चा झालेली असल्याचे ते म्हणाले. आम्ही उद्योगासाठी तीनशे एकर जमीन सुद्धा आरक्षित केलेली आहे. उद्योग मध्य प्रदेशात येतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असल्याचे त्यांनी सांगितले.
मध्यप्रदेश सरकारने आजही एक लाख बावीस हजार जमीन आरक्षित करून ठेवलेली आहे. उद्योजकांना आल्यानंतर ही जमीन आम्ही देणार आहोत. उद्योजकासाठी लागणारी जमीन वीज पाणी, स्किल वर्कर त्याचबरोबर सुरक्षितता त्या सगळ्या गोष्टी आम्ही द्यायला तयार आहोत. त्यासाठीच आम्ही हे गुंतवणुकीचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रातच नाही बाहेर प्रदेशातून सुद्धा गुंतवणूक आली पाहिजे, असे मध्यप्रदेशचे शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे.
विदेशी गुंतवणूकदारांना देखील त्यासाठी आमंत्रित करण्यात आल आहे असे.मुख्यमंत्री शिवराज चव्हाण म्हणाले. पुणे, मुंबईच्या तुलनेत जागा मध्यप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. लोकांना लागणारी वीज, पाणी, स्किल वर्कर सुद्धा मध्य प्रदेशमध्ये आहेत. ते बाहेरून आणण्याची गरज तेथे नाही.
