Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

छावा ग्रुप चे संतोष अप्पा आखाडे यांचा राज ठाकरे यांचे उपस्थितीत मनसेत प्रवेश


पुणे:आगामी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका तोंडावर असताना राज ठाकरे यांचा पुणे दौरा महत्त्वाचा ठरत आहे. आज पुणे येथील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात पुणे जिल्ह्यातील काही सामजिक कार्यकर्ते यांचा मनसेत पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी छावा ग्रुप पुणे याचे संस्थापक अध्यक्ष संतोष अप्पा आखाडे यांनी मनसे मध्ये प्रवेश केला.

त्याचबरोबर समीर कुटे ,राहुल वाल्हेकर, संदीप तागुंदे यांचा समावेश आहे.काही पक्षाच्या कार्यकर्त्यांची विविध पदावर नेमणूकही केली. यावेळी राज ठाकरे यांच्याकडून सत्कार करण्यात आला. याशिवाय दिवाळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कार्यालयात गर्दी केली होती.
काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निरिक्षकपदाची जबाबदारी दिली होती. त्यानंतर आता खडकवासला, भोर, वेल्हा, मुळशीतील कार्यकर्ते मनसेत प्रवेश केला. राज ठाकरे यांच्यासोबत प्रमुख नेते शहर मध्यवर्ती कार्यालयात उपस्थित होते. बारामती लोकसभा मतदारसंघावर मनसेने लक्ष केले आहे. मनसेत पक्षप्रवेश करताना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. , समीर कुटे ,राहुल वाल्हेकर, संदीप तागुंदे यांचा समावेश आहे.

आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात मनसेही सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे. अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेते, सरचिटणीस यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. या बैठकीनंतर मनसेनं विविध लोकसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक नेमले. त्यात पुणे ग्रामीण भागातील मावळ, शिरुर आणि बारामती लोकसभेसाठी पक्षाने पुण्यातील नेत्यांना जबाबदारी दिली होती. वसंत मोरे यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading