शहरातील रस्त्यांच्या खड्ड्यांविरोधात शिवसेनेचे आंदोलन
पुणे : पालिकेच्या व सत्ताधारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या विरोधात आज शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने गांधी लॅास येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
यावेळी उपस्थित शहरप्रमुख गजाननभाऊ थरकुडे, युवासेना-राजेश पळसकर, उपविभागप्रमुख अनिल दत्ताञय माझिरे, संदिपभाऊ मराठे,संजय धापसे,सोपान पौळ,देविदास पवार,दिलिप मरळ कैलास मोरे,छायाताई भोसले,मायाताई भोसले,विनायक सुर्यवंशी, हेमंत बोडके राम थरकुडे, वैभव दिघे, विनायक भुरूक,आकाश झांझले यावेळी उपस्थित होते.
गजानन थरकुडे म्हणाले, या पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे. या प्रशासना विरोधात आज आम्ही आंदोलन करत आहोत शहरातील रस्त्यांवरील खड्डे हे प्रशासनाने बुजवले पाहिजेत. यासाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत.
