Friday, May 29, 2026
Latest NewsSports

अनन्या, अदिती, श्रेया यांची विजयी सलामी

व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धा

पुणे : महाराष्ट्राच्या अनन्या गाडगीळ, अदिती गावडे, सानिका पाटणकर, श्रेया मेहता, अनन्या अगरवाल, ओजल राजक यांनी पुणे जिल्हा आणि मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) वतीने आयोजित व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेच्या पात्रता फेरीत महिला गटात विजयी सलामी दिली.

शिवाजीनगर येथील पीडीएमबीएच्या मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पीवायसी, लक्ष्मी क्रीडा मंदिर आणि सीओईपी इंजिनीअरिंग कॉलेजच्या कोर्टवर या स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने सुरू आहेत.

महिला एकेरीच्या पात्रतेच्या सलामीच्या लढतीत अनन्या गाडगीळने महाराष्ट्राच्याच सोफिया सिमनवर १५-१२, १५-३ असा, तर अदिती गावडेने कर्नाटकाच्या अखिला आनंदवर १५-५, १५-१२ असा आणि अस्मिता शेडगेने दिल्लीच्या मीरा मढवालवर २०-१८, १५-७ असा विजय मिळवला. सानिका पाटणकरने कर्नाटकाच्या आंचल जैनला १५-११, १५-१० असे नमविले. श्रेया मेहताने पंजाबच्या टिया महाजनला १५-१, १५-९ असे, तर अनन्या अगरवालने उत्तर प्रदेशच्या गरिमा रावतला १५-४, १५-२ असे आणि ओजल राजकने हरियाणाच्या क्रितिका मित्तलला १५-९, १५-८ असे नमविले. मयेकरची आगेकूच अनिरुद्ध मयेकरने आपली आगेकूच कायम राखली. त्याने पुरुष एकेरीच्या तिसऱया फेरीत आपलाच राज्य सहकारी अनिरुद्ध नायरला १५-७, १५-८ असे नमविले. बाराव्या मानांकित पश्चिम बंगालच्या अस्मित अगरवालने महाराष्ट्राच्या कीर्तेश चौधरीवर १५-६, १५-१० असा विजय मिळवला.

पात्रता फेरीचे निकाल – पुरुष एकेरी – तिसरी फेरी – चरण नाईक केलावतू (आंध्र प्रदेश) वि. वि. आयूष राज गुप्ता (उत्तर प्रदेश) १५-८, ११-१५, १५-९, यश कुलते (मध्य प्रदेश) वि. वि. श्रीकांत रामकृष्ण (तेलंगण) ११-१५, १५-५, १५-१२, शांतनू शर्मा (उत्तर प्रदेश) वि. वि. शिशिर द्विवेदी (मध्य प्रदेश) १५-१३, १५-१२, अजय नायर (केरळ) वि. वि. नेगी रेड्डी (आंध्र प्रदेश) १५-३, १५-८, सात्विक प्रशर (दिल्ली) वि. वि. पुष्कराज कुंभार (महाराष्ट्र) १५-१, १५-८, अंकित मोंडल (पश्चिम बंगाल) वि. वि. दिनेशकुमार जुज्जुरी (तेलंगण) १५-२, १५-१, आदित्य गुप्ता (तेलंगण) वि. वि. पल्लव जोशी (उत्तराखंड) १५-९, १५-१३, वेदांत शर्मा (राजस्थान) वि. वि. अंकित देशमुख (कर्नाटक) १५-१०, १५-४.

महिला एकेरी – पहिली फेरी – योशिता माथूर (राजस्थान) वि. वि. स्मिता चौधरी (महाराष्ट्र) १५-२, १५-३, अमोलिका सिंग वि. वि. सान्वी मुकादम (महाराष्ट्र) १५-१२, ७-१५, १५-८, आनंदिता तामरा (राजस्थान) वि. वि. श्रुती फणसे (महाराष्ट्र) १५-१०, १०-१५, १५-९. विद्या टी. वि. वि. सोनिया राजपूत १५-६, १५-६, अद्या पारशर वि. वि. ममैक्या लंका १५-९, १५-१०, पवित्रा नवीन वि. वि. फनी वेन्नेला मुदुनुरी १५-५, ११-१५, १५-७, योशिता माथूर वि. वि. स्मिता चौधरी १५-२, १५-३, आराध्या कुश्वाहा वि. वि. सिमरन चौधरी १५-७, १३-१५, १५-७, अमोलिका सिंग वि. वि. सान्वी मुकादम १५-१२, ७-१५, १५-८, निधी देसाई वि. वि. निथीशा राजेश १५-१०, ६-१५, १५-९.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading