Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा धुमाकूळ


पुणे:मागील आठवड्याभरापासून मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचं हातचं सोयाबीन आणि कापूस वाया गेलेलं आहे. आज दुपारनंतर पुण्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे तर मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात देखील मुसळधार पाऊस बरसत आहे.
मागील आठवड्याभरापासून मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचं हातचं सोयाबीन आणि कापूस वाया गेलेलं आहे. आज दुपारनंतर पुण्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे तर मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात देखील मुसळधार पाऊस बरसत आहे.
मुंबईत तर मागील आठवड्याभरापासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरुच आहे. त्यामुळे वारंवार मुंबईची तुंबई झाल्याचं पहावयास मिळालं. तसेच मुंबईसह उपनगरात पावसाने त्याची दमदार हजेरी लावली आहे. मुंबईला परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मागील पाच ते सहा दिवस जोरदार पावसानं हजेरी लावली. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात परतीच्या पावसाचा चांगलाच जोर होता. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान, उद्यापासूनन राज्यात ढगाळ वातावरण जरी असले तरी संपूर्ण महाराष्ट्रात उघडीपच जाणवेल. अगदीच कुठे तरी तुरळक पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading