Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी सिझन चौथा – दिवस १२ ! मी कट्टर आहे – अपूर्वा !

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अपूर्वा, रुचिरा आणि समृद्धीमध्ये रंगणार आहे चर्चा. ज्यामध्ये अपूर्वा रुचिरासमोर आपला मुद्दा मांडताना दिसणार आहे. अपूर्वा रुचिराला सांगताना दिसणार आहे, “त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मी तुला सांगते कि आपलं हे ठरलं होतं कोणी जिंकू दे अक्षय किंवा रोहित आपणं दोघांच्या आनंदात क्लिअर आहोत… मला काळजी तुझी वाटतं होती कारण तू नॉमिनेटेड आहेस. आणि हि तुझी सिद्ध करण्याची संधी होती, हे देखील मी तुला पोट तिडकीने सांगत होते. आता हे सगळं करत असताना, जर आज मी रोहितच्या बाजूने खेळते आहे तर मी अक्षयच्या बाजूने नाही बोलणार मी अशी मुलगी आहे… “मी कट्टर आहे” आणि याच मुद्द्यावरून माझं आणि समृद्धीचं वाजलं होतं. कारणं मला तेजस्विनीने जिंकावं (पहिले कॅप्टन्सी कार्य) असं वाटतं होतं, आणि जे चुगलीमध्ये आलं देखील. मी तेजूच्या बाजूने खेळतं होते आणि म्हणून समृद्धी भडकली होती. मी नाही biased खेळू शकतं. मी जर एका व्यक्तीला पाठिंबा देत असेन तर मी त्याच्याच नावाने बोलबाला करेन”. आता या सगळ्यावर रुचिरा आणि समृद्धीचे काय म्हणणे आहे बघूया आजच्या भागामध्ये.

बघूया आजच्या भागामध्ये पुढे काय घडले. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading