Sunday, June 21, 2026
Latest NewsSports

काजोल डिसूझाला मिळाले भारतीय १७ वर्षांखालील महिला राष्ट्रीय फुटबॉल संघात स्थान

मुंबई : लालिगा आणि देशाच्‍या विभिन्‍न भागांमधील तरूणांना तंत्रज्ञान माहिती व शारीरिक प्रशिक्षण देणारी इंडिया ऑन ट्रॅक यांचा संयुक्‍त प्रकल्‍प लालिगा फुटबॉल स्‍कूल्‍स इंडिया (एलएलएफएस)च्‍या एका विद्यार्थीनीची भारतीय १७ वर्षांखालील महिला फुटबॉल संघामध्‍ये निवड करण्‍यात आली आहे. २०१८ पासून पुण्‍यातील एलएलएफएस सेंटर येथे नियमितपणे प्रशिक्षण घेत असलेल्‍या १६ वर्षीय काजोल डिसूझाची नुकतेच राष्‍ट्रीय संघ प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्‍यात आली. ती सध्‍या ११ ते ३० ऑक्‍टोबर २०२२ पर्यंत भारतात आयोजित करण्‍यात आलेल्‍या फिफा अंडर-१७ विमेन्‍स वर्ल्‍ड कपमध्‍ये खेळत आहे.

मिडफिल्डर पोझिशनमध्ये खेळणारी एक टीम सदस्य म्हणून काजोल डिसूझा अव्‍वल स्पर्धेत स्वीडिश प्रशिक्षक थॉमस डेनरबी यांच्या नेतृत्वाखाली खेळेल. भारत अ गटात आहे, ज्यामध्ये ब्राझील, यूएसए आणि मोरोक्को यांचाही समावेश आहे. भारतीय संघ आज यूएसएविरूद्ध, १४ ऑक्टोबरला मोरोक्कोविरूद्ध आणि १७ ऑक्टोबरला ब्राझीलविरूद्ध सामने खेळणार आहे. भारतीय संघ आपले सर्व सामने ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर खेळणार आहे.

इंडियन नॅशनल विमेन्‍स अंडर-१७ फुटलबॉल टीमची फॉरवर्ड खेळाडू काजोल डिसूझा म्‍हणाली, ‘’राष्ट्रीय संघात निवड होणे आणि फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे. मला लहानपणापसून फुटबॉल आवडत आहे आणि लालिगा फुटबॉल स्कूलमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. मी पुणे केंद्रामधील माझ्या प्रशिक्षकांचे त्‍यांनी दिलेले ज्ञान आणि या टप्‍प्‍यापर्यंत पोहोचण्‍यामध्‍ये दिलेल्‍या पाठिंब्‍यासाठी आभार मानते.’’

लालिगाच्‍या फुटबॉल प्रोजेक्‍ट्स डेव्‍हलपमेंटचे सीनियर स्‍पेशालिस्‍ट आणि एलएलएफएचे प्रभारी सॉल वॅझक्‍वेज म्‍हणाले, ‘’आम्ही भारतात हा प्रकल्प सुरू केल्यापासून चार वर्षांत देशाच्या विविध भागांतील तरुणांमधील प्रचंड प्रतिभा आणि कौशल्य पाहिले आहे. काजोल ही यापैकीच एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि तिला जागतिक स्तरावर भारताचा ठसा उमटवण्यासाठी तिची प्रतिभा व कठोर परिश्रम करण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही तिच्या आणि इतर विद्यार्थ्यांच्या आकांक्षांना पाठिंबा देत राहू आणि तिला या अंडर-१७ वर्ल्‍ड कपसाठी शुभेच्छा देतो.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading