Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

“#लागली पैज” कोण जिंकणार ?


टीम राघवन आणि टीम वाघ ह्या दोघांमध्ये लागलेय टशन

यंदाच्या झी मराठी अवॉर्ड्स 2022 मध्ये, सुमीत राघवन, अमेय वाघ यांचे खुमासदार सूत्रसंचालन, कलाकारांचे दमदार परफॉर्मन्स, मजेदार स्किट्स आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, कुटुंब, मालिका यामध्ये रंगलेली चुरस पाहिला मिळाली. यंदाच्या पुरस्कारांचे खास म्हणजे सुमीत राघवन आणि अमेय वाघ यांच्यात लागलेली टशन.” #लागली पैज” म्हणत दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले होते. सुमीतच्या टीम मध्ये ‘तू चाल पुढं, तू तेव्हा तशी, दार दार उघड बये, डान्स महाराष्ट्र डान्स, चला हवा येऊ द्या, वेध भविष्याचा’ या मालिका होत्या. तर टीम वाघ मध्ये ‘नवा गडी नवं राज्य, माझी तुझी रेशीमगाठ, अप्पी आमची कलेक्टर, बस बाई बस, होम मिनिस्टर, आम्ही सारे खवय्ये’ या मालिका होत्या. आता कोणाची टीम बाजी मारणार टीम राघवन? कि टीम वाघ? ह्या दोघांमध्ये लागलेली टशन नक्की काय आहे? यासाठी यंदाचा झी मराठी अवॉर्ड २०२२ उत्सव नात्यांचा बघायलाचं हवा.
तेव्हा पाहायला विसरू नका “झी मराठी अवॉर्ड २०२२” शनिवार १५ ऑक्टोबर संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading