Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

सेवा हेच खरे संघटन – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : सेवेच्या बळावर आपण आपला देश जोडू शकतो. महाराष्ट्रभर माझ्या अनेक स्नेही व परिचित लोकांना आम्ही सामाजिक संस्था उघडून त्याद्वारे कार्य करण्यास प्रवृत्त केले. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याचे कार्य आम्ही करत आहोत. त्यामुळे सेवा हेच खरे संघटन आहे, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

महा एनजीओ फेडरेशन व शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी आयोजित सुंदर माझी प्रतिज्ञा या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाचे आयोजन म्हात्रे पूलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे करण्यात आले होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणून महा एनजीओ फेडरेशनचे प्रमुख शेखर मुंदडा, अकदमीच्या संस्थापक प्रा. अनुराधा येडके, राज तांबोळी व महा एनजीओ फेडरेशन संचालक, समिती व सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत पुणे परिसरातील ७५०० मुले या उपक्रमात सहभागी झाले होते. त्यातील निवडक १५० मुलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कॉपर वॉटर बॉटल, ट्रॉफी, प्रमाणपत्र, लॅमिनेट केलेली विद्यार्थी लिखित प्रतिज्ञा देऊन विद्यार्थी वर्गाचा गौरव करण्यात आला. यावेळी पुणे परिसरतील शाळेतील ज्येष्ठ शिक्षक , मुख्याध्यापक देखील उपस्थित होते.

शेखर मुंदडा म्हणाले, माणसाचे व्यक्तिमत्व आणि हस्ताक्षर यांच्यात जवळचा संबंध आहे. यांचे हस्ताक्षर सुंदर असते. त्यांचे व्यक्तिमत्त्वही तसेच सुंदर बनते. व्यक्तित्व घडवण्यात हस्ताक्षराचा मोठा वाटा वाटा असतो. आम्ही आमचा सहयोग सदर उपक्रमात महा एनजीओ फेडरेशन म्हणून देऊ शकलो. काहीतरी लिहीण्यापेक्षा ज्यातून देशातील एकता संघटन व विशेष करुन देश कर्तव्याची आपुलकीची भावना निर्माण होते अशी प्रतिज्ञा विद्यार्थी वर्गाचे उत्तम भवितव्य ठरवेल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading