पंतप्रधान मोदी ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द – खासदार के. लक्ष्मण
पुणे : भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी हडपसर येथे जागर सम्मेलन संपन्न झाले.सदर सम्मेलनाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी मोर्चा प्रमुख* .खा.डाॅ. के.लक्ष्मणजी,* राष्ट्रीय महामंञी .संगमलालजी गुप्ता,भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश आण्णा टिळेकर,पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक,पुणे शहराध्यक्ष .योगेश पिंगळे हे उपस्थित होते.
सदर प्रसंगी राष्ट्रीय महामंञी सोहनलाल गुप्ता म्हणाले की, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात इंपिरिकल डाटा तयार करुन महाराष्ट्र राज्यात ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळवुन दिले.
राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.के.लक्ष्मणजी म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहेत.
याप्रसंगी विशाल केदारी, पल्लवीताई केदारी,ओंकार माळवदकर, दिनेश नायकु, दिपक माने, संतोष शिंदे, नंदकुमार गोसावी, शंतनु नारके,यशोधन आखाडे, तुषार रायकर,शैलेश हिरणवार,दिनेश रासकर, स्मिताताई गायकवाड,बंडु कचरे,पंकज गिरमे, भीम देवकाते, मनोज साळी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
