fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsLIFESTYLEPUNE

वास्तुविशारद शिरीष दसनूरकर यांच्या १०० हून अधिक चित्रांचे प्रदर्शन

पुणे : प्रख्यात वास्तुविशारद शिरीष दसनूरकर यांनी अॅक्रीलिक आणि जल-रंगांच्या वापराद्वारे रेखाटलेली १०० हून अधिक निसर्गचित्रे आणि अॅब्सट्रक्ट प्रकारातील चित्रांचे अनोखे प्रदर्शन पुण्यात भरविण्यात येत आहे. हे प्रदर्शन १६ ऑक्टोबर रोजी टिळक रस्ता येथील हिराबागजवळील ज्योत्स्ना भोळे सभागृहाच्या रंगदर्शन कलादालन येथे सकाळी ९ ते रात्री ८:३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाबाबत दसनूरकर म्हणाले,“ माझे हे तिसरे प्रदर्शन असून, लॉकडाऊन कळात मी ही चित्रे रेखाटली आहेत. त्यावेळी उपलब्ध असलेल्या टाइल्स, जुने कागद आणि आंब्याची पाने यासारख्या गोष्टींचा वापर यामध्ये करण्यात आला असून, त्यामुळेच ही चित्रे केवळ कॅनव्हास किंवा कागदापुरती मर्यादित नाहीत.’’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading