राज्यपालांच्या उपस्थितीत सेवार्णव कार्यक्रम संपन्न
पुणे:अभाविप जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित आषाढी वारी वैद्यकीय सेवा उपक्रम २०२२ मध्ये सेवा देणाऱ्या विद्यार्थी व वैद्यगण यांचा सन्मान सोहळा सेवार्णव हा कार्यक्रम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी , व्यवस्थापन सदस्य प्रशांत म.आ.वि वि, नाशिक, अभाविप पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री श्री देवदत्त जी जोशी व यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.यावेळी आषाढी वारी वैद्यकिय सेवा उपक्रमामध्ये सहभाग घेणारे वैद्यकिय विद्यार्थी, वैद्यगण, अनेक आयुर्वेद व होमिओपॅथी फार्मसी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संयोजक रोहन मुक्के यांनी केले. जिज्ञासा द्वारे राबविण्यात येणारे वेगवेगळया उपक्रम तसेच आषाढी वारी वैद्यकिय सेवा उपक्रम २०२२ बद्दल ची विस्तृत माहिती व आजच्या सेवार्णव कार्यक्रमाचे स्वरूप यामधे मांडण्यात आले.
आषाढी वारी वैद्यकिय सेवा उपक्रमाच्या ७ वर्षांचा प्रवास चित्रफीत द्वारे दाखविण्यात आला. तसेच सेवार्णव या स्मरणिकेचे प्रकाशन मा. राज्यपाल व अन्य अतिथींच्या उपस्थितीत करण्यात आले. यानंतर वारी सेवा मध्ये मदत करणाऱ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आले.
अभाविप मांडणी व त्याचे इतर आयाम कार्य याबद्दलची माहिती देवदत्त जोशी यांनी दिली. वैद्य श्रीराम सावरिकर यांनी आयुष चिकित्सा पद्धतींचे समाजात वाढत असलेले महत्व व विद्यार्थ्यांचे आयुष्य शिक्षण पद्धती च्या ती वृद्धी मध्ये असलेली भूमिका यांबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय राज्यपाल यांनी सेवा कार्याचे महत्त्व सांगितले. 2022 च्या सेवाकार्यात सातशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हे सेवा कार्य असेच चालू राहिले तर येत्या सात वर्षात सात हजार हून अधिक वैद्यकीय विद्यार्थी सेवाकार्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अभाविप पुणे महानगर अध्यक्ष डॉ प्रगती ठाकूर यांनी केले.