Friday, May 29, 2026
ENTERTAINMENTLatest News

आज्जी सारंगची  साथ  देईल मुक्ताला आपल्या भावनांची कबुली देण्यास?

आर्या  व तिचे आई-वडिल हे एक जुने कौटुंबिक मित्र आहेत. तर ते नगरकरांच्या घरी येतात. मग रावसाहेब आर्या आणि सारंगच्या लग्नाची घोषणा करतात. सारंग मुक्ताला सांगतो की त्याचे आर्यावर प्रेम नाही  मुक्ता सारंगला विचारते की त्याला आणखी कोणी आवडते का? सारंग कबुली देण्याचा प्रयत्न करतो पण तो अपयशी ठरतो. तर दुसरी कडे आजी मुक्ताला खानदानी पारंपरिक दागिने घालायला सांगते. आज्जीच्या आग्रहामुळे मुक्ता दागिने घालते.  माधवी चोरीचा आरोप मुक्तावर घेते. तर दुसरीकडे आर्या  नटून थटून सारंगसमोर येते. परंतु त्याच लक्ष  मागे  उभी असलेल्या मुक्तावर आहे.  घरचे सारंगला खानदानी  तोडे आर्याला घालायला सांगतात. पण सारंग निमित्त देऊन तिथून पळ काढतो. सारंग आज्जी समोर मुक्तावर प्रेम असल्याची कबुली देतो. आज्जी सारंगची साथ देईल मुक्ताला आपल्या भावनांची कबुली देण्यास? त्यासाठी पाहायला विसरू नका ‘दार  उघड  बये ‘ सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading