Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिंदे गटाला मिळाले ढाल तलवार चिन्ह

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष दोन गटात विभागला आहे. त्यातच हा वाद न्यायालयातून निवडणूक आयोगाकडे गेला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. त्यामुळे दोन्ही गटांना आता स्वतंत्र नाव आणि चिन्ह मिळाले आहे. त्यात आता शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले आहे.

याआधी उद्धव ठाकरे गटाला मशाला हे चिन्ह मिळाले आहे. तर नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे मिळाले आहे. हे कालच निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले होते. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्यात आले होते. मात्र शिंदे गटाला चिन्हांचे पर्याय पुन्हा देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शिंदे गटाने तीन पर्याय दिले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading