fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

Pune – चार जणांनी मिळून १२ जणांना तब्बल सव्वा ३ कोटी रुपयाचा गंडा घातला

पुणे: आलिशान गाडी देतो म्हणून पुण्यातील चार जणांनी मिळून १२ जणांना तब्बल ३ कोटी २८ लाख ५० हजार रूपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी ऋषीकेश अशोक बारटक्के याच्या सह पुण्यातील तिघांविरूध्द विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन सुभाष शहा (सदाशिव पेठ), आदित्य दाडे (मुकुंदनगर, स्वारगेट) आणि  निलमणी धैर्यशील देसाई (बाणेर रोड) राहणार सर्व पुणे) यांच्या विरोधात विटा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या करण्यात आला आहे.

याबाबत माहुली येथील आबासाहेब दत्ताजीराव देशमुख यांनी ३ ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली होती.ऋषीकेश बारटक्के हा पुणे येथे कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करत असून त्यांनी सध्या निलमणी धैर्यशील देसाई यांच्या मालकीचे पर्वती येथील सर्व्हे नं.८७/१अ/१ पैकी ४९ गुंठे जागा कुलमुखत्यार पत्राव्दारे सर्व शासकीय कार्यवाही पुर्ण करून तो विक्री करण्यासाठी घेतलेली असल्याचे सांगून निलमणी देसाई यांच्याकडून ऋषीकेश बारटक्के यांचे नांवे घेतलेले कुलमुखत्यारपत्र देशमुख यांना दाखविले. या जागेमध्ये असलेल्या महसुलच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि जागेमध्ये इतर कामे करण्यासाठी अंदाजे ४ कोटी रूपयांची गरज असून या जागेमध्ये त्यांनी गुंतवणूक केल्यास रक्कमेवरती ३ महिन्यामध्ये दीडपट मोबदला बारटक्के आणि शहा हे देतील, तसेच नवीन चारचाकी अलिशान वाहनही देतील, असे आमिष दाखविले.

ऋषीकेश बारटक्के व नितीन शहा यांच्याकडे एकूण ३ कोटी ५८ लाख रूपये दिले. त्यावेळी ऋषीकेश बारटक्के याने त्याच्या नावाची फोर्ड इंडिव्हेअर (क्र. एम.एच.१२, एन.पी.०००६) ही गाडी व्यवहारापोटी आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या उद्देशाने देशमुख यांना दिली. परंतु बारटक्के याने ही गाडी खरेदी केल्यापासून बँकेचे हप्ते भरणा केलेले नाहीत. तसेच या गाडीवर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचा बाेजा असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर देशमुख आणि त्यांच्या सोबतच्या इतर गुंतवणूकदारांनी ऋषीकेश बारटक्के आणि नितीन शहा यांच्याकडे पैशांबाबत पाठपुरावा केला.त्यावेळी १८ फेब्रुवारी २०२० रोजी करारनामा करून ४ महिन्यामध्ये पैसे देण्याचे मान्य केले. परंतु त्यानंतर आजपावेता पैसे दिलेले नाहीत.  त्यामुळे देशमुख यांचे १ काेटी ५१ लाख रूपये व इतर गुंतवणूकदार यांच्याकडील १ काेटी ७७ लाख ५० हजार असे एकूण ३ काेटी २८ लाख ५० हजार रूपये गुंतवणूक स्वरूपात घेऊन त्यावर ३ महिन्यात दीडपट रक्कम करण्याचे अलिशान गाडी देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading