Thursday, May 28, 2026
BusinessLatest News

क्रोमाच्या माय फेस्टिव्ह ड्रीम कॅम्पेनमध्ये यंदा सणासुदीला लाखो इच्छा पूर्ण होतील!

पुणे : सणासुदीचा आनंद प्रत्येकासाठी संस्मरणीय बनवण्यासाठी, भारतातील पहिले आणि विश्वसनीय ओम्नी चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर व टाटा परिवारातील एक ब्रँड क्रोमाने लाखो इच्छा पूर्ण करेल असे अतिशय अनोखे व नवे #MyFestiveDream कॅम्पेन पहिल्यांदा सुरु केले आहे. सणासुदीच्या आनंदात अजून जास्त भर घालण्यासाठी क्रोमा स्टोर्स आणि croma.com वेबसाईटवर आकर्षक वैयक्तिक ऑफर्सचा लाभ घेऊन ग्राहक आपली आवडीची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने खरेदी करू शकतील. हे कॅम्पेन १५ ऑक्टोबरपर्यंत चालेल. स्टोर्स आणि वेबसाईटव्यतिरिक्त ग्राहक 7077773333 वर मिस्ड कॉल देऊ शकतात, त्यानंतर त्या युजर्सना एक एसएमएस पाठवला जाईल ज्यामध्ये लँडिंग पेजची लिंक असेल.

#MyFestiveDream कॅम्पेनमध्ये ग्राहकांना अशा ऑफर्स मिळतील ज्या त्यांच्या विशलिस्टच्या आधारेच तयार केलेल्या असतील. क्रोमाने वचन दिले आहे की, ते आपल्या ग्राहकांच्या इच्छा पूर्ण करतील. क्रोम आपल्या ग्राहकांना खास तयार करण्यात आलेल्या डील्स आधीच जिंकण्याची संधी देत आहे. ऑडिओ उत्पादने, स्मार्टफोन्स, ऍक्सेसरीज, स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर्स, एसी, स्वयंपाकघरातील उपकरणे, ग्रूमिंग आणि स्टायलिंग टूल्स यासारख्या विविध कॅटेगरीजमधून आपली विशलिस्ट बनवून ग्राहक या कॅम्पेनचा लाभ घेऊ शकतील. विशलिस्टनंतर ग्राहकांना त्यांच्या ई-मेल व एसएमएसवर पर्सनलाइज्ड ऑफर्स येऊ लागतील.

आपल्या ग्राहकांसाठी ही संपूर्ण प्रक्रिया सहजसोपी बनावी यासाठी क्रोमाच्या सर्व स्टोर्समध्ये क्यूआर कोड असलेले पोस्टर्स लावले जातील. हा क्यूआर कोड स्कॅन करून आवश्यक माहिती भरून #MyFestiveDream कॅम्पेनमध्ये भाग घेता येईल.

लार्ज फॉरमॅट स्टोर स्पेशालिस्ट ओम्नी चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर क्रोमाने आपल्या ग्राहकांना खरेदीचा परिपूर्ण अनुभव प्रदान करणे आणि ग्राहकांसाठी जे योग्य आहे ते उत्पादन निवडण्यात त्यांची मदत करणे हे पहिल्यापासूनच आपले उद्दिष्ट मानले आहे. यावेळी सणासुदीच्या काळात लाखो इच्छा पूर्ण करून ग्राहकांच्या जीवनात नवा प्रकाश आणण्यासाठी क्रोमाने हे कॅम्पेन सुरु केले आहे.

१५ ऑक्टोबर  पर्यंत चालणार असलेल्या या कॅम्पेनमध्ये क्रोमा आपल्या ग्राहकांना मोठमोठ्या ब्रँड्सची गॅजेट्स आणि घरगुती उपकरणांच्या संपूर्ण श्रेणीवर आकर्षक सूट व ऑफर्स मिळवण्यासाठी सक्षम बनवत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading