fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsSports

अखिलेश चव्हाण, विहान पंडीत, शुभ नहाटा, आरूश पोतदार, मिहीर काळे, लव परदेशी, आरव मुळे, अगस्त्या चर्तुवेदी, अनिश वडनेरकर यांची आगेकूच !!

सोलारीस क्लब अखिल भारतीय मानांकन अजिंक्यपद मालिका टेनिस स्पर्धा

पुणे : सोलारीस क्लब तर्फे ‘सोलारीस क्लब अखिल भारतीय अजिंक्यपद मालिका (चॅम्पियन सिरीज) टेनिस (१२ वर्षाखालील) स्पर्धेत अखिलेश चव्हाण, विहान पंडीत, शुभ नहाटा, आरूश पोतदार, मिहीर काळे, लव परदेशी, आरव मुळे, अगस्त्या चर्तुवेदी, अनिश वडनेरकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी विरूध्द विजय मिळवत आगेकूच केली.

कोथरूड येथील सोलारीस क्लब, मयुर कॉलनी येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत अखिलेश चव्हाण याने सिद्धार्थ कोंढाळकर याचा ९-६ पराभव केला. विहान पंडीत याने रौनक सेठी याचा ९-६ असा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसर्‍या चरणात प्रवेश केला. शुभ नहाटा याने वेदांत जोशी याचा ९-७ असा पराभव केला. आरूश पोतदार याने नील बोंद्रे याचा ९-२ असा पराभव करून आगेकूच केली.

मिहीर काळे याने रूद्र पटवर्धन याचा ९-४ असा तर, लव परदेशी याने लेशा नायडू याचा ९-५ असा पराभव केला. आरव मुळे याने नमन शहा याचा ९-५ असा तर, अगस्त्या चर्तुवेदी याने हिमांशु देसाई याचा ९-४ असा पराभव करून आगेकूच केली. अनिश वडनेरकर याने सुमेर मेधी याचा ९-० असा सहज पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा संक्षिप्त निकालः १२ वर्षाखालील गटः पात्रता पहिली फेरीः
अखिलेश चव्हाण वि.वि. सिद्धार्थ कोंढाळकर ९-६; विहान पंडीत वि.वि. रौनक सेठी ९-६;
शुभ नहाटा वि.वि. वेदांत जोशी ९-७; आरूश पोतदार वि.वि. नील बोंद्रे ९-२;
राघव अगरवाल वि.वि. अवनीश परब ९-०; अर्णव पांडे वि.वि. मोहम्मद रायन ९-१;
वेद परदेशी वि.वि. इशान जगताप ९-१; अभिनव महामुनी वि.वि. रूद्रप्रताप चव्हाण ९-४;
मिहीर काळे वि.वि. रूद्र पटवर्धन ९-४; लव परदेशी वि.वि. लेशा नायडू ९-५;
आशिरीत माजी वि.वि. साहील मोडक ९-१; अनिश वडनेरकर वि.वि. सुमेर मेधी ९-०;
आरव मुळे वि.वि. नमन शहा ९-५; अगस्त्या चर्तुवेदी वि.वि. हिमांशु देसाई ९-४;
विवान मल्होत्रा वि.वि. अवधुत निखाते ९-२; विश्‍वतेज देशमुख वि.वि. जय जाधव ९-३.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading