Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

बहारदार वादनाने रंगली ‘स्वरपर्व’ संगीत मैफिल

आणि व्हायोलिन’च्या सुरात रसिक मंत्रमुग्ध

पुणे: संतुराचे सुरेल स्वर आणि व्हायोलीनच्या दमदार वादनात मंत्रमुग्ध झालेले रसिक, कलाकारांना मिळालेला टाळ्यांच्या उस्फूर्त प्रतिसाद अशा बहारदार वातावरणात स्वरपर्व हा विशेष सांगीतिक कार्यक्रम संपन्न झाला.

तालानुभूती फाउंडेशन, परिमल व प्रमोद चौधरी फाउंडेशन आणि विलास जावडेकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथा ‘स्वरपर्व – पर्व नव्या दमाच्या आश्वासक स्वरांचे’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम शुक्रवारी (दि. ७ ऑक्टोबर) मयूर कॉलनी, कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिर प्रशालेच्या एमईएस सभागृहात संपन्न झाला. यावेळी उद्योजक विलास जावडेकर, हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पं. शौनक अभिषेकी यांची प्रमुख उपस्थिती होती. शास्त्रीय संगीतातील नव्या पिढीला आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

कार्यक्रमाची सुरवात डॉ. शंतनु गोखले यांच्या संतूर वादनाने झाली. त्यांनी राग पुरियाकल्याणमध्ये रूपक आणि दृत तीनतालातील दोन रचना सादर केल्या. त्यांना रोहित मुजुमदार यांनी तबल्यावर अतिशय पूरक साथसंगत केली. त्यानंतर यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन वादन झाले. त्यांनी राग यमनमध्ये विलंबित आणि दृत तीनतालातील दोन रचना सादर केल्या. ‘म्हारो प्रणाम ‘ या भजन सादरीकरणाने त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली. त्यांना प्रणव गुरव यांनी तबल्यावर समर्पक साथसंगत केली. दोन्ही कलाकारांना रसिकांनी टाळ्यांच्या भरभरून प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading