Bigg Boss Marathi – VOOT EXTRA मसाला : अक्षय केळकर आणि ती
अक्षय केळकरला नात्यातीलच कोणी एक मुलगी मेसेजेस पाठवत होती जे त्याच्या आईच्या निदर्शनास आले आणि त्याचबद्दल अक्षयने सदस्यांना सांगितला किस्सा. त्याने मेसेजेस इग्नोर केले पण आईने मात्र सांगितले कि, मुलगी तुला मेसेजेस करतं आहे, तुझ्यात इंटरेस्टेड असावी. नात्यातील होती म्हणून मी तिच्या घरी रहायला गेलो… त्यांच्यात झाली बरीच चर्चा. अक्षय म्हणाला छानचं होते ते क्षण, पण तो ब्रेक अप झाला आणि… माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम आईनी जुळवून दिलं. एका इव्हेंटला गेलो असता मला सांगितलं काय सल्ला देशील तो म्हणाला, “मी सल्ला नाही देणार पण, माझे आई बाबा नववी नापास आहेत, रिक्षावाला घरं सांभाळतो आहे, इतका फ्रिडम दिला दोन्ही मुलांना कि ते बरोबर मार्गावर चालत आहेत… शिक्षित राहून अशिक्षित राहण्यापेक्षा अशिक्षित राहून शिक्षित राहणं गरजेचे आहे.
