Friday, May 29, 2026
ENTERTAINMENTLatest News

योगयोगेश्वर जय शंकर मालिकेचा बळी प्रथेबद्दल ‘महारविवार’

कलर्स मराठीवरील योगयोगेश्वर जय शंकर मालिकेचा येत्या रविवारी नऊ सप्टेंबरला सादर होणारा भाग शंकर महाराजांच्या आध्यात्मिक शिकवणीतला अत्यंत महत्वाचा पैलू उलगडून सांगणारा आहे. बालशंकराच्या भक्त उद्धाराच्या बाण्यानुसार एका अद्भुत,दिव्य लीलेद्वारे बळीप्रथेबद्दल शंकर महाराजांची शिकवण,त्यांचे भाष्य या एका तासाच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. बळीप्रथेबद्दल शंकर महाराजांचे जे गूढ वक्तव्य आहे,’देवीला बळी प्रिय आहे .. पण’, यातला हा ‘पण’ बालशंकरलीलेने उलगडणार आहे. उत्तम सादरीकरणामुळे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असून या मालिकेतून शंकर महाराजांनी दिलेली शिकवण घराघरात पोहचली आहे.
रविवार ९ ऑक्टोबरला सादर होणारा एका तासाचा ‘महारविवार’ ही विशेष ठरेल याची झलक प्रोमोमधून मिळाली आहे. तेव्हा नक्की बघा योगयोगेश्वर जय शंकर मालिकेचा बळीप्रथेबद्दल ‘महारविवार’ ९ ऑक्टोबर दु.१२ आणि संध्या ७.३० वा. कलर्स मराठीवर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading