fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsMAHARASHTRANATIONAL

महाराष्ट्राची पर्यटन पुरस्कारात बाजी : महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली  : महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आज राज्याला प्रदान करण्यात आला. यासह विविध श्रेणीतील एकूण 9 पुरस्कार राज्याला आज प्रदान करण्यात आले.

येथील विज्ञान भवनात जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2018-19 चे राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखडकेंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डीकेंद्रीय पर्यटन राज्य मंत्री अजय भटकेंद्रीय पर्यटन सचिव अरविंद सिंहअतिरीक्त सचिव राकेश वर्मा मंचावर उपस्थित होते.

यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते प्रमुख 11 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तर उर्वरित पुरस्कारांचे वितरण केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्या करण्यात आले.

महाराष्ट्राला सर्वोकृष्ट राज्यासाठीचा सर्वंकष पर्यटन विकासाचा द्वितीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी पर्यटन विभागमहाराष्ट्र शासन यांच्यावतीने हा पुरस्कार  स्वीकारला.

पर्यटन क्षेत्रातील विविध सेवा सुविधा पुरविणाऱ्या शासकीय संस्थांसोबतच खाजगी सेवा पुरविणा-या संस्थांनाही  राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्येही महाराष्ट्राने मोहर उमटविली आहे.

पर्यटकांना उत्कृष्ट नागरी सुविधा पुरविल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील पाचगणी नगर परिषदेला राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी आणि पाचगणी चे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांनी स्वीकारला.

मुंबईतील ताजमहाल पॅलेस या पंचतारांकीत डिलक्स हॉटेलला पंचतारांकीत हॉटेल’ श्रेणीतील चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पश्चिम विभागातील उत्कृष्ट निरोगता (वेलनेस) केंद्र या श्रेणीतील पुरस्कार पुण्यातील आत्मंतन वेलनेसमुळशी (पुणे) यांना प्रदान करण्यात आला.

ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठीच्या श्रेणीतील  पुरस्कार चंदन भडसावळे यांना सगुनणाबाग (नेरळ) येथे सुरू केलेल्या ग्रामीण पर्यटन केंद्राला प्रदान करण्यात आला.

द वेस्टर्न रूट्स या ट्रॅव्हल कंपनीला जबाबदार पर्यटन प्रकल्पांतर्गत उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार श्री. परांजपे यांनी स्वीकारला.

पर्यटक वाहतूक परीचालक श्रेणी –2 मधील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मुंबईतील गीती ट्रॅव्हल्स यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मनमोहन गोयल यांनी स्वीकारला.

पर्यटक परिवहन संचालक श्रेणी – 1 मधील द्वितीय क्रमांचा पुरस्कार ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस मर्यादित यांना प्रदान करण्यात आला.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाद्वारे परवानाप्राप्त अतुल्य भारत बेड एंड ब्रेकफास्ट (गोल्डन आणि सिल्वर) या श्रेणींतर्गत पाचगणी येथील डाला रूस्टरहोमस्टे यांना उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल  पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कॅप्टन विकास गोखले आणि श्रीमती गोखले यांनी स्वीकारला.

सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर म्हणालेया पुरस्काराने आम्हाला आगामी काळात पर्यटन विकासाच्या कार्यास प्रेरणा व उर्जा मिळणार आहे. वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळेवाहतूकीचे विकसित जाळेनिवासाच्या दर्जेदार सुविधा आणि अनुभवजन्य पर्यटनाच्या आधारावर आगामी काळात औद्योगिक क्षेत्रातील आघाडी प्रमाणेच पर्यटन क्षेत्रातही महाराष्ट्र आघाडीवर राहील. शाश्वत पर्यटनसुरक्षित पर्यटन व अनुभवजन्य पर्यटन या त्रिसूत्रीवर आधारीत पर्यटन विकासाचे मॉडेल आगामी काळात महाराष्ट्रात उभारले जाईलअशी प्रतिक्रिया श्री. सावळकर यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: