fbpx

PFI आंदोलन प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई ६ जणांना कोंढव्यातून ताब्यात घेतलं

पुणे: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात देशभरात कारवाई सुरूच आहे. आज सकाळी देशभरातुन सुमारे 170 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यादरम्यान पोलिसांनी सात राज्यांमध्ये पुन्हा छापे टाकले आहेत.

राष्ट्रीय तपास संस्था आणि अंमलबजावणी संचालनालयानाकडुन 13 राज्यांमध्ये छापे टाकुन 100 हून अधिक PFI कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. काही दिवसांपूर्वी झालेल्या या छापेमारीत पुण्यातूनही काही PFI कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पुण्यात PFI कार्यकर्त्यांकडून आंदोलने करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास एजन्सीनं पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया या संघटनेवरील छापेमारीविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घोषणा देताना उपस्थित असणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

त्यानंतर आता पुन्हा पी एफ आय आंदोलन प्रकरणी पुणे पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातून या ६ जणांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या तपासातून आणि चौकशीतून पोलिस नेमकं काय शोधत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर ताब्यात घेतलेल्या संशयितांकडुन नवे खुलासे होत असल्यामुळे ही चौकशी करण्यात येत असल्याचे बोलले जातं आहे.
पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याप्रकरणी ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांच्यावरील देशद्रोहच कलम मागे घेण्यात आलं होतं. पुणे पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या एका जुन्या निकालाचा दाखला देत या निकालानुसार घोषणाबाजी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, असं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: