Pune – खड्ड्यांच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन
पुणे : गेल्या पाच वर्षात पुणे शहरात भाजपच्या ठेकेदारीराजने केलेल्या निकृष्ठ कामांमुळे संपूर्ण पुणे शहर खड्डेमय झालेले आहे. शहरात खड्डये पडल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने काँग्रेस पार्टी तर्फे आज येथे भारतीय जनता पार्टी व महापालिकेच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. त्या आंदोलनाला माजी महापौर कमल व्यवहारे, आबा बागुल , अभय छाजेड, माझी शहर अध्यक्ष रमेश बागवे, प्रवीण करपे , संजय बालगुडे , रजनी त्रिभुवन , पुणे शहरातील काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अरविंद शिंदे म्हणाले,पुणे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे.हजारो कोटी रुपयांची रस्त्यांची कामे गेल्या ५ वर्षात होऊन देखील जर पुणे शहरातील रस्त्यांची ही अवस्था असेल तर या कामांच्या गुणवत्तेच्या बाबत निश्चितच प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत . या शहरात साडेआठ हजार कोटी रुपयांचे बजेट असणारी महानगरपालिका जर पुणेकरांचा टॅक्स
गोळा करून पुणेकरांना सोयी सुविधा देऊ शकत नसेल तर निश्चितच पुणेकरांच्या मनामध्ये गेल्या ५ वर्षातील सत्ताधारी भाजपच्याबाबत मोठा रोष आहे.या खड्ड्यांमुळे शहरात दररोज अपघात होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आमचे महानगरपालिकेला व सत्ताधाऱ्यांना विनंती आहे. शहरातील रस्त्यावरील खड्डे आपण बुजवावे जर खड्डे बुजवले नाहीत .तर आम्ही येणाऱ्या पुढील काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन करू असे अरविंद शिंदे म्हणाले.
रमेश बागवे म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात खड्ड्यांवरील रस्ते खड्डे मुक्त झाले पाहिजे असे म्हणाले होते. पण या सत्ताधाऱ्यांनी व महानगरपालिका आयुक्तांनी हे खड्डे बुजवले नाहीत. या खड्ड्यांवरील खर्च हा वेगळाच दाखवला आहे. आम्ही पावसाळ्यात सुद्धा खड्डे बुजवा म्हणून आंदोलन केले तरी या प्रशासनाला काहीच फरक पडत नाही. असे रमेश बागवे म्हणाले.
