PFI विरोधात NIA, केंद्र आणि राज्य सरकारकडे ठोस पुरावे उपलब्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीर जमाव जमा करून आंदोलन केले. NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने पीएसआय च्या राज्यस्तरीय नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ काल पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी केली. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (पीएफआय) कारवाई झाली, याचा अर्थच असा आहे की, मोठ्या प्रमाणात यासंदर्भातील पुरावे हे एटीएस, एनआयए, केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत.असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,केरळ सरकारनेही पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी केली होती. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तेव्हा आता चौकशी सुरू आहे. यातून अनेक गोष्टी समोर येतील. तसेच देशात अस्वस्थता निर्माण करण्याची पीएफआयच्या मोडस ऑपरेंडीसंदर्भातील षडयंत्र उघड होतील.असेही फडणवीस म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि एकनाथ खडसे यांच्यात फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली. त्यानंतर आता खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, मला याबद्दल कल्पना नाही.
