‘आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स’तर्फे ‘एबीएसएलआय अक्षय प्लॅन’ सादर
आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स (एबीएसएलआय) या ‘आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड’च्या (एबीसीएल) आयुर्विमा क्षेत्रातील उपकंपनीने एक नवीन-युगातील बचत सोल्यूशन देणारी ‘एबीएसएलआय अक्षय प्लॅन’ या नावाची योजना सादर केली आहे. ही एक नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक, बचत स्वरुपाची आयुर्विमा योजना आहे. ती रोख बोनस (घोषित केल्यास) सुविधेद्वारे तात्काळ तरलतेचा पर्याय देते. ही योजना तुमच्या कुटुंबाच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सर्वसमावेशक आयुर्विमा संरक्षण आणि नियमित उत्पन्नाचा स्रोत या दोन्ही गोष्टी मिळवून देते.
‘एबीएसएलआय अक्षय’ योजनेमुळे पॉलिसीच्या पहिल्या वर्षाच्या अखेरीपासून पॉलिसीधारकास रोख बोनस काढता येतो, तसेच त्याला उत्पन्नाचा नियमित स्रोतही मिळतो. त्याशिवाय पॉलिसीधारकांना वार्षिक, अर्ध-वार्षिक, त्रैमासिक किंवा मासिक स्वरुपात रोख बोनस (घोषित केल्यास) प्राप्त करण्याचाही पर्याय आहे. हा बोनस वर्षाच्या शेवटी, सहामाही किंवा तिमाहीनंतर अथवा दर महिन्याच्या शेवटी, जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे, देय असणार आहे.
‘एबीएसएलआय अक्षय प्लॅन’ सादर करताना ‘आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी कमलेश राव म्हणाले, “एबीएसएलआय अक्षय योजनेमुळे आमचे पॉलिसीधारक पॉलिसीच्या पहिल्या वर्षाच्या अखेरीपासून रोख तरलतेचा आनंद घेण्यास सक्षम होतील. त्यातून त्यांना आवश्यक ती आर्थिक हमी मिळेल. तसेच कोणत्याही कठीण प्रसंगी त्यांना विमाकवचही मिळेल. या योजनेतून त्यांना उत्पन्नाचा निरंतर स्रोत प्राप्त होत राहील. तसेच पॉलिसीधारकाला स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी सुरक्षित भवितव्य आणि आरामदायी जीवनशैली निर्माण करण्याचे ध्येय साकारता येईल. आमच्या ग्राहकांना त्यांच्या बचतीच्या गरजा पूर्ण करताना आयुर्विम्याचे आवश्यक कवचही प्राप्त व्हावे, असा ‘आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स’मध्ये आमचा सतत प्रयत्न असतो.”
‘एबीएसएलआय अक्षय योजना ‘ही बाजारात स्पर्धात्मक ठरेल असा परतावा देते आणि त्याकरीता पॉलिसीधारकांना लवचिक स्वरुपाचे पर्यायही देते. यामध्ये प्रीमियमचे पेमेंट करण्याच्या अटी लवचिक स्वरुपात आहेत. पॉलिसीधारकांना वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी पॉलिसी अटींच्या विस्तृत श्रेणीमधून निवड करण्याची मुभा येथे मिळते. दीर्घ काळाचा (२५, ३०, ३५, ४० वर्षे) विचार करून किंवा संपूर्ण आयुष्यभरासाठी (वयाच्या ८५ किवा १०० वर्षांपर्यंत) या योजनेचे लाभ पॉलिसीधारक घेऊ शकतात. पॉलिसीधारकांना घोषित रोख बोनस (घोषित केल्यास) पुढे ढकलण्याची आणि जमा रक्कम रोख बोनसच्या रूपात जमा करण्याची लवचिकता असेल आणि पॉलिसी मुदतीदरम्यान कोणत्याही वेळी ही रक्कम अंशतः किंवा पूर्णपणे त्यांना काढता येईल. पॉलिसीधारक त्यांच्या सोयीनुसार बोनसविषयक पर्यायांची अदलाबदल करू शकतात.
‘एबीएसएलआय अक्षय योजने’चा लाभ घेण्यासाठी प्रवेशाची कमाल वयाची अट ५५ वर्षे इतकी आहे, तर किमान वयाची अट ३० दिवस इतकी आहे. याशिवाय, योजनेचा किमान वार्षिक प्रीमियम २४ हजार रुपये असणे आवश्यक आहे. पॉलिसीधारक ६, ८, १०, १२ आणि १५ वर्षांपर्यंतच्या प्रीमियम पेमेंट टर्मच्या पर्यायांमधून निवड करू शकतात.
रोख बोनस (घोषित केल्यास) मिळण्याबरोबरच एक टर्मिनल बोनस (घोषित केला असल्यास) आयुर्विमा पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर किंवा पॉलिसी समर्पण केल्यानंतर किंवा तिची मुदत संपल्यानंतर (यापैकी जे आधी असेल त्याप्रमाणे) देय असू शकतो.
